Thursday, April 25, 2024
Homeनाशिककृषीमंत्री भुसेंचा शेतकर्‍यांशी संवाद

कृषीमंत्री भुसेंचा शेतकर्‍यांशी संवाद

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शासकिय योजनांची (Government schemes) गावपातळीवर नियमित अंमलबजावणी होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी तालुक्यातील विविध गावांत भेटी देत शेतकर्‍यांशी संवाद साधला.

- Advertisement -

तालुक्यात कृषीमंत्री भुसे यांच्या गावनिहाय दौर्‍याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागात वीजपुरवठा (Power supply) सुरळीत होण्यासाठी कंपनी अधिकार्‍यांनी व्यवस्थित नियोजन करावे, असे आदेश देत ना. भुसे यांनी गावकर्‍यांशी चर्चा करुन रोहित्र दुरुस्ती करणे, रोहित्राची क्षमता वाढविणे, नवीन रोहित्र व वीजजोडणी करणे, मागणीप्रमाणे सोलर पंपाबाबत (Solar pump) ऑनलाईन अर्ज (Apply online) भरुन घेणे,

विद्युत तारांचे झोळ काढणे, रस्त्याच्या दुतर्फा दिवे चालू ठेवणे व दुरुस्ती करणे, वायरिंग बदलणे आदी कामांबाबत वीज कंपनी अधिकार्‍यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक गावात कृषी कार्यालयाने महाडीबीटीमार्फत निवड झालेल्या शेतकर्‍यांशी (farmers) संपर्क साधून कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मागरदर्शन करावे, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त करुन तहसिलदारांना सादर करावेत. एकही लाभार्थीं वंचित राहणार नाही याची दक्षत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

आज ना. भुसे यांनी तालुक्यातील गाळणे, नागझरी, डोंगराळे, भारदेनगर, घाणेगाव, कौळाणे गा., अस्ताणे, टोकडे, हाताणे या गावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधत कृषी विभागाच्या विविध योजनांचा (Various schemes of agriculture department) लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले. वर दौर्‍यात उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पं.स. सदस्य भगवान मालपुरे, जि.प. सदस्य शेजवळ,

प्रमोद पाटील, श्रीराम मिस्तरी, मनोहरबापू बच्छाव, अशोक भदाणे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद महाजन, कार्यकारी अभियंता वाघमारे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, विद्युत कंपनीचे भामरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या