Saturday, April 27, 2024
Homeनगरकृषी विभागाने शेतकर्‍यांना तत्पर सेवा द्यावी

कृषी विभागाने शेतकर्‍यांना तत्पर सेवा द्यावी

नेवासा (तालुका वार्ताहर)- शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी कृषी विभागाने तत्परतेने सेवा द्यावी त्यांना मार्गदर्शन करण्याची नेहमी भूमीका घ्यावी असे आवाहन नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी केले. कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने नेवासा येथे आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते

पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले तर कृषी दिनानिमित्त दि.1 जुलै ते दि. 7 जुलै या दिवसात होणार्‍या कृषी संजीवनी सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी शेखर शेलार, कृषी अधिकारी शीतल मैड, ज्ञानदेव गुरगुडे, बन्सीभाऊ आगळे, कृषी सहायक कल्याण शेजुळ,विस्तार अधिकारी शिवराम सुपे व्यासपीठावर उपस्थित होते.

कृषी अधिकारी शीतल मैड यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. कृषी सप्ताह कालावधीत कृषी संजीवनी कार्यक्रम अंतर्गत वृक्षलागवड व फळबाग लागवड मोहीम राबविण्यात येणार असून शेतकर्‍यांच्या हितावह विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

सभापती रावसाहेब कांगुणे म्हणाले की वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी हितावह निर्णय घेतले म्हणून 1 जुलै या त्यांच्या जन्मदिनी कृषी दिन साजरा करण्यात येतो. शेतकरी उपाशी राहू नये म्हणून त्यांनी हरित क्रांती करून मनरेगासारखी मोहीम राबविली होती. कृषी विभागाने विशेष भूमिका बजावून शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले

शेतकर्‍यांच्या योजनांचा लाभ देण्यासाठीआपण नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असून शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्दिली.

सूत्रसंचालन जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास वाघ यांनी केले तर विस्तार अधिकारी दिगंबर भांड यांनी आभार मानले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुभाष शिरोळे, सुनील शूळ, किशोर कुरकुटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या