Saturday, April 27, 2024
Homeनगरशेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्यावर बहरली कलिंगड पिकाची शेती

शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्यावर बहरली कलिंगड पिकाची शेती

पुणतांबा | Puntamba

शेती महामंडळाच्या (Agriculture Corporation) चांगदेवनगर (Changdevnagar) मळ्यावर सध्या ऊस पिका ऐवजी कलिंगड पिकाची (Kalingad Crops) शेती फुलू लागल्यामुळे पुणतांब्याच्या (Puntamba) शिवारात वेगळाच बदल जाणवू लागला आहे.

- Advertisement -

25 जुलै 1963 मध्ये चांगदेवनगर (Changdevnagar) मळ्याची स्थापना झाली होती. तात्कालिक परिस्थितीत गोदावरी उजव्या कालव्याच्या (Godavari Right Canal) पाट पाण्यामुळे 17, 18 व 19 चारीच्या लाभ क्षेत्रात उसाचे पीक (Sugarcane Crops) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या मळ्यांना ऊस मळा म्हणून संबोधले जात होते. महामंडळाच्या ताब्यात असलेल्या तीन हजार पेक्षा जास्त क्षेत्रापैकी 2400 ते 2500 एकर क्षेत्रावर उसाची (Sugarcane) लागवड केली जात होती. जवळच 1942 मध्ये चांगदेवनगर येथे चांगदेव शुगर मिल्स हा खासगी साखर कारखाना असल्यामुळे या मळ्याला उसाच्या गळीतासाठी फारशी अडचण नव्हती.

यावेळी चांगदेव कारखान्यात (Changdev Factory) कायम हंगामी तसेच बदली म्हणून 525 कामगार कार्यरत होते. तसेच शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्यावरही 1990 पर्यंत कायम, रोजंदारी तसेच नैमित्तीक कामगार म्हणून स्त्री व पुरुष कामगारांची संख्या 1 हजाराच्या पुढे होती. हा काळ अत्यंत वैभवाचा काळ समजला जात होता. मात्र या काळात शेती महामंडळाकडे असलेल्या खंडकरी शेतकरी वर्गाच्या खंडाच्या जमिनी परत मागण्यासाठी खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ सक्रिय झाली.

त्यामुळे 1978 मध्ये 175 खंडकरी शेतकर्‍यांना 1352 एकर जमिन परत करण्यात आली तर 2012 मध्ये 268 शेतकर्‍यांना 2148 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे चांगदेव नगर मळ्यावर जमिनीचे क्षेत्र कमी झाले. त्यातच गोदावरी उजव्या कालव्याचे पाटपाणी 1980 पासून कमी कमी होत गेल्यामुळे चांगदेवनगर मळ्याचे अस्तित्वही धोक्यात आहे.

अखेर शेती महामंडळाने शिल्लक राहिलेल्या जमिनीवर संयुक्त शेती करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. 494 एकर शेती कराराने खासगी शेतकर्‍यांना 10 वर्षाच्या मुदतीवर देण्यात आली आहे. जमिनीचा पोत पाहून प्रति एकरी दर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे कराराने जे ब्लॉक देण्यात आले आहे त्या ब्लॉकमध्ये ज्यांनी जमीन कराराने घेतली आहे. त्यांनी मोठ्या आकाराचे शेततळे केले आहे. तसेच विहीरी सुद्धा खोदल्या आहेत.

गेल्या 4 वर्षापासून परिसरात पाऊस समाधानकारक असल्यामुळे शेतकर्‍यांनी पिक पध्दतीत बदल केला आहे. गहू (Wheat), मका (Corn), कांदा (Onion), सोयाबीन (Soybeans) पिकाबरोबरच अनेकांनी कलिंगडासारखी (Kalingad) पिके घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मळ्याच्या मुख्य कार्यालयाच्या पश्चिम बाजूला असलेल्या एका ब्लॉकमध्येही कलिंगडचे पिक चांगलेच बहरले आहे.

ज्या मळ्यावर उसाशिवाय दुसरी शेती केली जात नव्हती त्या मळ्यावर आता नवनवीन पिके घेतली जात असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. अनेकांना रोजगारही मिळाला आहे. स्थानिक मजुरांची संख्या कमी असल्यामुळे अनेकांनी बिहारसह अनेक राज्यातून मजुरांच्या टोळ्या आणून व्यावसायिक पद्धतीने शेती करणे सुरु केल्यामुळे पुणतांबा परिसराचे शिवार पुन्हा हिरवेगार दिसण्यास सुरु झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या