Friday, April 26, 2024
Homeनगरकृषी तंत्रज्ञान पार्कसाठी राहुरी कृषी विद्यापीठास मिळणार भरीव निधी

कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी राहुरी कृषी विद्यापीठास मिळणार भरीव निधी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार (Agricultural education, research and extension) या क्षेत्रामध्ये कार्य फार मोठे आहे. या विद्यापीठास कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी भरीव निधी (Funding for the University Agricultural Technology Park) देण्यासाठी सर्व प्रयत्न करु, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी केले.

- Advertisement -

महात्मा फुले कृषी विद्यापीठात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह साजरा (Celebrate Forest Festival Week) झाला. या पार्श्वभूमीवर काल पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांच्या हस्ते वृक्षारोपन करुन वनमहोत्सव सप्ताहाचा सांगता (Concludes the forest festival by planting trees) समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ना. मुश्रीफ बोलत होते.

पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी बिगरगाभा पाणलोट क्षेत्र विकासासाठी विद्यापीठाच्या पाणलोटक्षेत्र विकास प्रकल्पाला रु. 28 लाखाच्या निधीचे (Fund) पत्र कुलगुरुंना (Vice-Chancellor) सुपूर्त केले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आदर्शगाव योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील (Vice Chancellor Dr. P.G. Patil) यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने (Forest ranger Suvarna Mane), उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, डॉ. महानंद माने, विजय कोते, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते.

याप्रसंगी अ पार्ट ब प्रक्षेत्र, पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात, निवाराच्या प्रांगणात, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प-वनशेती, आदर्श गाव योजनेतंर्गत पाणलोट क्षेत्र, मधवर्ती रोपवाटीका प्रक्षेत्र, कोरडवाहू फळे संशोधन प्रक्षेत्र, उद्यानविद्या विभाग, रोपवाटीका प्रक्षेत्र, वनशेती प्रकल्प-डिग्रज टेकडी, कमी क्षमता असणार्‍या पिकांवरील संशोधन प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन व वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालयात या वनमहोत्सव सप्ताहानिमित्त 75 हजार वृक्षांची लागवड (Planting of 75 thousand trees) करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या