Friday, April 26, 2024
Homeनगरकृषी पंपाची थकबाकी माफ करावी : डॉ. धनंजय धनवटे

कृषी पंपाची थकबाकी माफ करावी : डॉ. धनंजय धनवटे

पुणतांबा (वार्ताहर) –

शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाचे उत्पन्न व होणारा खर्च याचा मेळच बसत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे कृषी

- Advertisement -

पंपावरील विज बिलात थकबाकी वाढत आहे. ही थकबाकी माफ झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी थकीत कृषी पंपावरील विज बिलात वैशिष्ट्यपूर्ण सवलत देण्यासाठी कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 नुसार शेतकर्‍यांना शेती विज पंपावर विजेच्या थकबाकीवर विविध टप्प्यावर सवलत देण्यासाठी ग्राम सचिवालय सभागृहात उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील व सहाय्यक अभियंता जाधव यांच्या उपस्थितीत मिटींग आयोजित करण्यात आली होती.

डी. डी. पाटील यानी सांगितले की, ग्रामपंचायत अतर्गत थकीत व इतर विज बील वसूल झाल्यास 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावर कृषीपंपाच्या ग्राहकांच्या पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येईल. जिल्हा स्तरावरील विविध कामे करण्यात येणार आहे. ग्राम विकासाचा यात सहभाग असल्यामुळे ग्रामपंचायत, सहकारी संस्था, साखर कारखाने, सुतगिरणी याच्यांकडे कृषी वीज बील भरण्याचा पर्याय उपलब्ध करुण देण्यात येणार असून या संस्थांना वीज बीलाच्या पावती प्रमाणे पाच रुपये शिवाय थकित वसूल केलास तीस टक्के प्रोत्साहन पर निधी, चालू वीज बील वसूल केल्यास वीस टक्के, देण्यात येणार आहे म्हणून या कामात ग्राम पंचायती नी सहभाग घ्यावा असे सांगून विज बील भरण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील यांनी केले.

यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी ग्रामपंचायतीकडे विज बील भरणा केंद्र सुरु करण्याची तयारी दर्शवून तसा प्रस्ताव सादर करणार आहोत. तसेच शेतकरी कृषीपंपाची व घरगुती ग्राहकांचे विज प्रवाह कट करू नये. शेतकरी कृषी पंपाची थकबाकी माफ करावी, अशी मागणी केली. यावेळी शेतकरी नामदेवराव धनवटे, संजय सांबारे, घरघुती ग्राहक व विज कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या