Thursday, April 25, 2024
Homeनगरशेती साहित्य चोरणारा सराईत जेरबंद; सुपा पोलिसांची कामगिरी

शेती साहित्य चोरणारा सराईत जेरबंद; सुपा पोलिसांची कामगिरी

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

सुपा पोलिसांनी रांजणगाव रोड, रुई छत्रपती परिसरात शेतकर्‍यांचे साहित्य चोरणार्‍या सराईताच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

- Advertisement -

प्रदीप अरकस काळे (20, रा. रांजणगाव मशिद) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी शांताराम आनंदराव लगड यांनी सुपा पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यानुसार मागील महिन्यात रुई छत्रपती येथील पाझर तलावाजवळील लगड यांच्या विहिरीवरून सुमारे 6 हजार रुपये किमतीचा अ‍ॅटो मोबाईल स्टार्टर व त्यात सीम सह 4 हजार रुपये किमतीचा स्टार्टर चोरीस गेला होता.

सुपा पोलिसांनी गोपनीय माहीतीच्या आधारे त्या परिसरातील गावांतून यासदर्भात माहिती गोळा केली. यात सुपा पोलिसांना काही माहितीच्या अधारे प्रदीप अरकस काळे यावर पाळत ठेवून त्यास अटक केली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने रूई छत्रपती येथील गुन्ह्यासह विविध गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच 20 हजार रुपये किमतीची जुनी हिरो होंडा मोटारसायकल, एक लोखंडी कटावनी असा मुद्देमाल सुपा पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या