Friday, April 26, 2024
Homeनगरशेतजमीन मोजणीचा महाराष्ट्रात पायलट प्रोजेक्टसाठी अंबडची निवड

शेतजमीन मोजणीचा महाराष्ट्रात पायलट प्रोजेक्टसाठी अंबडची निवड

अकोले |प्रतिनिधी| Akole

शेतजमीन मोजणीचा महाराष्ट् राज्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून अकोले तालुक्यातील अंबड गावची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

हाच आंबड पॅटर्न राज्यात राबवविणार असल्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे. लवकरच या योजनेचा शुभारंभ ना. थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

अकोले तालुक्यातील अंबड या गावची संपुर्ण शिवार मोजणी करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, पोलिस पाटील भाऊसाहेब कानवडे, माजी सरपंच दत्तू जाधव, माधवराव भोर, नामदेवराव जाधव, भास्कर कानवडे, कैलास कानवडे, रमेश जाधव, केशव मालूंजकर, अजाबा कानवडे, शिवराम भोर, सुधीर कानवडे, भरत भोर, कचरू भोर, बादशहा भोर, बबन भोर, माधव जाधव, मधुकर जाधव, सुनिल भोर, भुषण जाधव, लिंबा जाधव, रमेश जाधव, संदिप भोर, प्रमोद भोर, ज्ञानेश्वर जाधव, संपत भोर, संदिप कानवडे, नवनाथ जाधव, नवनाथ भोर आदि ग्रामस्थांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून आग्रही मागणी केली होती. त्याला मंत्री थोरात यांनी हिरवा कंदील दाखवून हा पारदर्शक प्रोजेक्ट अंबड पॅटर्न म्हणून राज्यात राबवू असे आश्वासन दिले होते.

या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल आयुक्त श्री. चोकलिंगम, नाशिक विभागाचे उपआयुक्त श्री. कुलकर्णी, अहमदनगर जिल्ह्याचे अधिक्षक श्री. शिंदे, अकोले तालुक्याचे तहशीलदार मनोज कांबळे तसेच महसूल विभागाचे सर्व अधिकारी यांनी शेतजमीन मोजणी करण्यासाठी करण्यात आलेल्या खुणा या संदर्भात पहाणी करत गावकर्‍यांना मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या