शेती माल, फळांच्या निर्यातीसाठी कृषी विभागाचा स्वतंत्र निर्यात कक्ष

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र (Maharashtra) हे फलोत्पादन क्षेत्र (Horticulture area), उत्पादन व निर्यातीमध्ये (Production and export) अग्रेसर असून राज्यातून मोठ्या प्रमाणात फळ (Fruit), भाजीपाला व कृषी मालाची निर्यात (Exports of vegetables and agricultural commodities) विविध देशांना होते. या निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी पुणे विभागातील (Pune Department) सर्व जिल्ह्यात किडरोगमुक्त शेतमाल (disease free farm produce), फलोत्पादन (Horticulture) यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र निर्यात कक्ष स्थापन केला आहे. कृषी उपसंचालक (Deputy Director of Agriculture) यांची याठिकाणी नोडल अधिकारी (Nodal Officer) म्हणून नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारने 2018 ला कृषी माल निर्यात धोरण तयार केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने ही 2019 मध्ये महाराष्ट्र कृषी निर्यात धोरण लागू केले आहे. तसेच फळे, भाजीपाला व कृषी माल उत्पादन करणार्‍या संस्थांचे शेतकरी उत्पादक समूह स्थापन करण्यात आले आहेत. त्यांना विविध योजनांतर्गत नवनवीन तंत्रज्ञानाचा व सुविधांचा वापर करुन निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून त्याची विक्री स्थनिक बाजारपेठ बरोबरच निर्यात करण्यास मदत करण्यात येत आहे.

शेतकर्‍यांच्या सुशिक्षित मुलांचा कल व्यावसायिक शेतीकडे आहे. परंतू व्यवसायाबाबत व निर्यातीबाबतची कार्यपध्दती, कागदपत्रांची पूर्तता, विविध देशांच्या अटी व शतीचे पालन तसेच पॅकिंग, ग्रेडींग आदी माहिती गाव पातळीवर मार्गदर्शन करण्याची मागणी होती. यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, उद्योजक व व्यवसायिक यांना निर्यात विषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी उपसंचालक यांची नोडल अधिकारी निर्यात नेमणूक करण्यात आली असून पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात निर्यात मार्गदशन केंद्र स्थापन सुरू करण्यात येत आहे. नगरच्या केंद्र हे आज (दि.15) पासून सुरू होत असल्याची माहिती उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे यांनी दिली.

नोंदणीसाठी पाच नेट उपलब्ध

राज्यातील कृषीमाल, फलोत्पादन यांच्या निर्यातीसाठी द्राक्ष नेट, आंबा नेट, सिस्टज नेट (लिंबू, संत्रा आणि मोसंबी) व्हेज नेट आणि बिटल नेट (खान्यांचे पान) ही उपलब्ध आहेत. नगरच्या कृषी अधीक्षक कार्यालयातून दोन वर्षापासून या निर्यातीसाठी फायटोसॅनिटरी प्रमाणपण दिले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *