Thursday, May 9, 2024
Homeनाशिककृषी अभ्यासक्रमाचे सत्र एप्रिलपासून; बारावीच्या गुणप्रमाण निश्चितीसाठी समिती

कृषी अभ्यासक्रमाचे सत्र एप्रिलपासून; बारावीच्या गुणप्रमाण निश्चितीसाठी समिती

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार पडल्यानंतर यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रांत येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नवीन कृषी शिक्षण धोरणांच्या आखणीसाठी तसेच यापुढे उच्च शिक्षणप्रवेशाच्या पात्रतेसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सह बारावीच्या परीक्षेचे गुणप्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीने एक महिन्याच्या कालमर्यादेत ३० एप्रिलपर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालस्तरावर करण्यात यावी.

कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) गुणांसह बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरणे तसेच त्याच्या प्रमाणाची निश्चिती करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी.

या समितीने अभ्यास करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल शासनाला सादर करावा. राज्यातील इतर अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या धर्तीवर नवीन कृषी शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, कृषी तज्ज्ञ, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या