Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअश्वमेध ग्रुपचा श्रीलंकेच्या कंपनीसोबत सामंजस्य करार

अश्वमेध ग्रुपचा श्रीलंकेच्या कंपनीसोबत सामंजस्य करार

करंजी खुर्द । प्रतिनिधी Nashik / Karanjikhurd

शेतीसाठी सेंद्रिय उत्पादने Organic products for agriculture, ,संशोधन ,उत्पादन आणि सेवा या क्षेत्रात अश्वमेधची गेल्या २० वर्षांपासून घोडदौड चालू असून आता श्रीलंकेतील Sri Lanka शेतकऱ्यांना Farmers देखील या संशोधनाचा लाभ लवकरच होणार आहे.

- Advertisement -

कोलंबो येथिल फर्टीलायझर कंपनी Fertilizer Company in Colombo बरोबर अश्वमेधचा Ashwamedh Group नुकताच सामंजस्य करार आणि वर्क ॲग्रिमेंट झाले असून तेथे पहिल्यांदाच बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टीसाईड चे उत्पादन सुरु होणार आहे, हा आंतरराष्ट्रीय बहुमान अश्वमेधला मिळाला असल्याचे प्रख्यात शास्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे ,आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ व अश्वमेध ग्रुपचे चेअरमन यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीलंकेमधील बायो कंट्रोल एजंटचे संशोधनात्मक कार्य तेथील कृषी विद्यापीठे आणि अश्वमेधच्या वतीने नुकतेच बायो टेकनॉलॉजीचे शिक्षण घेऊन व विशेष प्रशिक्षण पूर्ण करून समर्थ वाघचौरे श्रीलंकेतील शेतीला नवी दिशा देण्यासाठी रवाना होत आहेत.

या संदर्भात श्रीलंकेतील फर्टिलायझर कंपनीचे चेअरमन आणि त्यांची टीम यांनी नुकतीच अश्वमेध प्रकल्पाला भेट देऊन करारावर स्वाक्षऱ्या केल्या. १०० टक्के सेंद्रिय शेती करण्याचा मानस श्रीलंकेतील राजपक्ष सरकारने निर्णय घेतला असून त्यास दिशा दर्शन करण्यासाठी सदर प्रकल्पास विशेष महत्व असणार आहे. हा बहुमान कोपरगांव Kopargaon स्थित आणि महाराष्ट्रातील अश्वमेधला मिळाला आहे.

मागील हंगामात युरियाचा तुटवडा दूर करण्यासाठी भारतीय केंद्र सरकारने श्रीलंकेला नॅनो युरिया विमान सेवेद्वारे पाठवून मदत केली होती. आता पुढील हंगामात ही उणीव अश्वमेधच्या प्रयत्नाने दूर होणार आहे. अश्वमेध च्या या कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या