Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत अग्नीवीरांची भरती होणार; असा करा अर्ज

औरंगाबादेत अग्नीवीरांची भरती होणार; असा करा अर्ज

औरंगाबाद | Aurangabad

केंद्रीय संरक्षण दलाने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंर्गत (Agnipath Scheme) सैन्य भरती लवकरच सुरू होत आहे. औरंगाबादमध्ये अग्निपथ (Agnipath Aurangabad) योजनेअंतर्गत अग्नीवीरांची सुद्धा भरती करण्यात येणार आहे. 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये शहरात पात्र तरुणांची निवड केली जाईल. या भरतीमध्ये औरंगाबाद (Aurangabad), बुलडाणा (Buldhana), हिंगोली (HIngoli), जालना, नांदेड, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुणांना सहभागी होता येणार आहे.

- Advertisement -

देशाच्या सैन्यदलामध्ये सहभागी होऊन देशसेवा करण्याची ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त तरुणांनी या भरती परीक्षेसाठी आपली हजेरी लावावी आणि यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

कुठे करणार अर्ज?

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले की, अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची आहे. तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. प्राप्त अर्जाची छानणी इंडियन आर्मीव्दारे होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर भरती संदर्भातील शारिरीक चाचणी तसेच संबंधित प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे. तेव्हा इच्छुक तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या