Friday, April 26, 2024
Homeनाशिकपेठला राष्ट्रवादी काँँग्रेसचे आंदोलन

पेठला राष्ट्रवादी काँँग्रेसचे आंदोलन

पेठ | प्रतिनिधी Peth

नाशिक – पेठ – धरमपूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik-Peth – Dharampur National Highway) पेठ शहरानजीकच्या हट्टीपाडा गावानजीक ( Hattipada village )२०० मीटर रस्ता दोन्ही ठेकेदारांंच्या अंंर्तगत वादात अत्यंत दयनीय व वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झालेला असताना त्या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनास ( National Highways Administration )विनंती करुणही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने व सातत्याने त्याच ठिकाणी नित्याचे अपघात होत असल्याने राष्ट्रवादी काँँग्रेस ( NCP ) तर्फे युवक तालुकाध्यक्ष गिरीश गावीत यांचे नेतृत्वा खाली जवळपास तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

- Advertisement -

आंदोलनाशिवाय प्रशासन हलचाल करीत नाही त्याचा प्रत्यय यावेळीही आला कार्यकर्ते रस्त्यावर बसताच राष्ट्रीय महामार्गाचे सहा . अभियंता भोसले यांनी तातडीने खराब झालेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्याचे लेखी अश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला .

यावेळी रास्ता रोकोत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचीत नगरसेवक रामदास गायकवाड , युवराज लिमले , विजय धूम अलका कस्तुरे यांच्या सह प्रविण बिडगर , हिरामण पवार यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्ते उपस्थित होते .

आंदोलन काळात पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता . दरम्यान रस्त्याचे दुतर्फा शेकडो वाहने अडकुन पडली होती . आंदोलनाचे ठिकाणीच तहसिलदार संदीप भोसले यांनी निवेदन स्विकारले नंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

यावेळी जि . प . सदस्य भास्कर गावीत व पं . स . सभापती विलास अलबाड यांनीही उपस्थित राहून खराब रस्त्यामुळे वाहन धारकांन त्रास होत असल्याने तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी रास्त असल्याचे व आंदोलनास पाठींबा दर्शविण्यात आला .

- Advertisment -

ताज्या बातम्या