Friday, April 26, 2024
Homeनाशिकबहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने महसूल कार्यालयावर धरणे आंदोलन

बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने महसूल कार्यालयावर धरणे आंदोलन

नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी)

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील महसूल आयुक्त कार्यालयावर बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे, रमेश आवटे, अशोक खालकर, मनोहर कोरडे, जगदीश पवार, प्रशांत दिवे, संतोष साळवे, साहेबराव खर्जुल, राजू देसले, गोरख बलकवडे, भास्कर गोडसे, सुदाम बोराडे, राजाराम धनवटे आधी असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

धरणे आंदोलनानंतर महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती या आंदोलनाचे संयोजक दत्ता गायकवाड यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या