स्मार्ट सिटीच्या कारभाराविरोधात आंदोलन

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटीच्या ( Smart City Company )भोंगळ कारभाराच्या विरोधात आज शालिमार चौकात नागरिक व व्यापार्‍यांनी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड आंदोलन करीत निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलकांनी नवीन कामे नको, अपूर्ण कामे पूर्ण करा, स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी झाली पाहिजे, खड्ड्यांचा शहर करणार्‍या स्मार्टसिटी कंपनीचा धिक्कार या असो, जागे व्हा, जागे व्हा नाशिककरांनो जागे व्हा, आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी तथा शहराध्यक्ष शरद आहेर, रऊफ कोकणी, बबन बोडके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक व व्यापार्‍यांनी आंदोलनात भाग घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *