Monday, April 29, 2024
Homeधुळे1100 रूपयांची लाच घेतांना एजंट रंगेहात

1100 रूपयांची लाच घेतांना एजंट रंगेहात

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

वडिलोपार्जित शेतीवरील बहिणीच्या हक्कसोड करून तक्रारदाराचे नाव सातबारावर नोंदणी करून नवीन उतारा देण्यासाठी 1100 रूपयांची लाच घेणार्‍या खाजगी एजंटला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

- Advertisement -

आज दुपारी पिंपळनेर तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.पिंपळनेर येथील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेतीवरील बहिणीच्या हक्कसोड करून तक्रारदार यांचे नाव सातबारावर नोंदणी करून नवीन उतारा मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात काम करणारा खाजगी इसम रघुनाथ श्रावण ऐखंडे (वय-63 रा.विश्वकर्मा चौक, गोपाळ नगर पिंपळनेर ता.साक्री) याने उतारा मिळून देण्याचे मोबदल्यात 1100 रुपयांची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने पिंपळनेर तलाठी कार्यालयात सापळा लावला.

तक्रारदाराकडे 1100 रूपये लाचेची मागणी करून ती रघुनाथ एखंडे याने स्वीकारल्यानंतर त्याला पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई पोलिस उपउपधिक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सरग, संतोष हिरे, भुषण खलानेकर, कृष्णकांत वाडीले, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या