Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाळू तस्करी विरोधात खा. सुजय विखेंनी दंड थोपाटले

वाळू तस्करी विरोधात खा. सुजय विखेंनी दंड थोपाटले

टाकळी ढोकेश्वर |वार्ताहर| Takali Dhokeshwar

नगर जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोकलेन, जेसीबीसह इतर यंत्रांच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात

- Advertisement -

असून या वाळू उपशाचा तमाशा महसूल विभागाने तातडीने बंद करावा, अन्यथा 10 दिवसांत त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, दूध संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे, अरुण ठाणगे, अमोल साळवे आदी उपस्थित होते. यावेळी खा. डॉ. विखे यानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशान साधत या अवैध वाळू उपशामुळे जिल्ह्याचे व तालुक्या तालुक्यातील राजकारण नासले असल्याची टीका केली.

आता या अवैध वाळू उपसाविरोधात महसूल विभागाने कारवाई न केल्यास त्याचे पडसाद विधानसभेत व लोकसभेत उमटतील. सध्या करोनाचे निर्बंध सर्वसामान्यांवर असून वाळू व्यवसायावर करोनाचे कोणतेही निर्बंध का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आर्शिवाद घेवून या वाळू उपशाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.

यासंबंधीचे सर्व सबळ पुरावे व्हिडिओ शुटिंग, जीपीएस यंत्रणा आमच्याकडे असून याचे पुरावे जिल्हाधिकार्‍यांना दोन दिवसांत सादर करणार आहे. महसूल विभागाच्यावतीने अनेक ठिकाणी वाळू लिलाव केले आहे. या ठिकाणी पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात आहे. यामुळे महसूल विभागाने तातडीने हे पोकलेन व जेसीबी जप्त करावे, अशी मागणीही खा. विखे यांनी केली आहे.

दोन दिवसात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन या संबंधीची माहिती त्यांच्यासमोर पुराव्यानिशी मांडणार असून त्यांना कारवाईसाठी 7 दिवसाचा कालावधी देणार असल्याचे सांगितले आहे.

महसूल मंत्र्यांचा ‘तो’ व्यक्तिगत प्रश्न

अवैध वाळू तस्करी हा मंत्री थोरात यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्न आहे. यामुळे त्यावर त्यांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे निवेदन दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांकडे जाणार आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात हे पाहणार आहे. वाळू तस्करीचा हा तमाशा बंद झाला पाहिजे, अशी ही माझी आग्रही मागणी आहे. अन्यथा याचे पडसाद विधानसभेत, लोकसभेत उमटतील, असा त्यांनी इशाराही दिला आहे.

अधिकार्‍यांबरोबर कार्यकर्त्यांनाही हप्ते

जिल्ह्यातील अनेक नद्यामधून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा रात्रंदिवस केला जात आहे. यासाठी मोठी हप्तेखोरी होत असल्याचा आरोप खा. डॉ. विखे पाटील यांनी करत ही वाळू तस्करी चालण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वाळू उपशामुळे जिल्ह्यासह तालुक्याचे नुकसान होत असून अनेक राजकीय नेत्यांची भागीदारी या वाळू व्यवसायात आहे. पैसा पुढारी कमवतात आणि कार्यकर्त्यांना भांडायला लावतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या