Thursday, April 25, 2024
Homeनगररस्ते उखडून टाकणार्‍या वाळू तस्करांविरूद्ध ना. तनपुरेंचे कारवाईचे आदेश

रस्ते उखडून टाकणार्‍या वाळू तस्करांविरूद्ध ना. तनपुरेंचे कारवाईचे आदेश

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अनधिकृतरित्या वाळू उपसा करणार्‍या वाहनचालकांनी राहुरी तालुक्यातील देसवंडी, तमनर आखाडा येथे

- Advertisement -

मुळा नदीतून जाणारा नदीपात्रातील रस्ता उखडून टाकल्याने या रस्त्यावरून जाणार्‍यांची वाट बिकट झाली असून या रस्त्यातच मोठे खड्डे पडल्याने तो धोकादायक बनला आहे. याबाबत नागरिकांनी थेट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे तक्रार केली. बेकायदा वाळू वाहतूक करून रस्ता उखडून टाकणार्‍या वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, रस्ता उखडून टाकणार्‍या अनधिकृत वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिले आहेत. तसेच रस्ता दुरूस्त करून देण्याचेही आश्वासन ना. तनपुरे यांनी दिले.

हा रस्ता उखडल्याने या रस्त्यावरून जाणार्‍या- येणार्‍या नागरिक, महिला, शालेय मुले-मुली तसेच दूध उत्पादक शेतकर्‍यांची मोठी गैरसोय झाल्याने अनेक नागरिकांनी याबाबत राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यापुढे तक्रारींचा पाढाच वाचला. या तक्रारींची ना. तनपुरे यांनी तातडीने दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

देसवंडी, तमनर आखाडा येथील शहरातील तिळेश्वर मंदिर ते गणपती घाट दरम्यान नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांनी बेकायदा वाळू उचलत राहुरी येथून देसवंडी येथे जाणारा कच्चा रस्ता उखडून टाकला आहे. काल सकाळी देसवंडी, तमनर आखाडा येथील बाबा कल्हापुरे, सरपंच गणेश खेवरे, दिलीप कल्हापुरे, प्रवीण शिरसाठ, सुभाष पवार, प्रकाश शिरसाठ, तमनर आखाडाचे उपसरपंच आप्पासाहेब तमनर, दिलीप तमनर, किशोर तमनर या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री तनपुरे यांची भेट घेऊन रस्ता पूर्ववत सुरू करून द्यावा.

याठिकाणी पूल बांधून देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मागणीवरून ना. तनपुरे यांनी काल सकाळी मुळा नदी येथे समक्ष जाऊन तहसीलदार शेख यांच्यासमवेत पाहणी करून नदीपात्रातील बेकायदा होणारा वाळू उपसा त्वरित बंद करून तस्करांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळघट, नंदकुमार तनपुरे, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष धीरज पानसंबळ, दिलीप कल्हापुरे, सागर कल्हापुरे, शंकर तमनर, लालासाहेब तमनर, किशोर जाधव, बाबासाहेब येवले आदींसह नागरिक उपस्थित होते.

बंद पडलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी ना. तनपुरे यांनी तातडीने काम करण्याच्या सूचना करून यासाठी स्थानिक नागरिक, शेतकरी यांनी आपला लोकसहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या