Wednesday, April 24, 2024
Homeनगरअवैध धंद्यांविरोधात आश्वीत रिपाईचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

अवैध धंद्यांविरोधात आश्वीत रिपाईचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी व परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असणार्‍या वाळू तस्करीसह विविध प्रकारे अवैध धंद्यांच्या विरोधात

- Advertisement -

रिपब्लिकन पक्ष (आठवले) व एकलव्य संघटनेच्यावतीने काल सकाळी 11 वाजता आश्वी पोलिस स्टेशनसमोर मोर्चा काढण्यात आला. आश्वी परिसरातील अवैध धंदे त्वरीत बंद करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. आश्वी पोलिस स्टेशनला 3 एप्रिल पर्यंत परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचे अल्टीमेट देण्यात आला.

यावेळी निवेदनात शेळके पुढे म्हणाले, शिर्डी विधानसभा मतदार संघातील 28 गावासह इतर गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु असून या अवैध वाम मार्गाने होणार्‍या धंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याने उद्याची पिढी ही बरबाद होते का? अशी भीती निर्माण झाली आहे.

या गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणाही पाऊल उचलताना दिसत नसून पोलिस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर होणारे मटका, जुगार, गुटखा विक्री होताना दिसत असतानाही पोलिस यंत्रणा गप्प का? अशी शंका लोकांमध्ये निर्माण होताना दिसत आहे.

आश्वी व परिसरात वाळू तस्करी, मटका, जुगार, गुटखे आदि माध्यमातून सर्रास अवैध धंद्यांचा सुळसळाट असल्याने पोलिसांनी यावर त्वरीत बंदी आणावी याकरिता आश्वी पोलिस स्टेशनवर धडक मोर्चा नेण्यात आला.

रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके, रिपाई युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, शहराध्यक्ष कासार, तालुका फोर्स अध्यक्ष राजेंद्र चद्रभान बर्डे, रमेश भोसले, सुनिल पवार, राघु बर्डे, बाबासाहेब बर्डे, विक्रम बर्डे, सुनिल कदम, दत्तू आघाव, संग्राम सोनवणे, संकेत सांगळे, विजय शेळके, सागर जगताप आदिसह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

आश्वी व परिसरात मोठया प्रमाणात अवैध धंदे सुरु असुन यातून तरुण पिढी वाया जात असून भविष्यात तरुणांना समाज्यात चांगली संधी मिळावी म्हणून अवैध धंद्याला आळा घालणे महत्वाचे असून पोलिसांनी एक सामाजिक प्रबोधन म्हणून अवैध धंद्याला आळा घालावा.

– आशिष शेळके, तालुकाध्यक्ष रिपाई, संगमनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या