Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक'ऑफ्रोचा 'राज्यस्तरीय सेवक मेळावा आज नागपूरला

‘ऑफ्रोचा ‘राज्यस्तरीय सेवक मेळावा आज नागपूरला

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयासह सर्वच पातळीवरील सेवकांच्या हिताकरिता लढणाऱ्या ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमनच्यावतीने रविवारी (दि. १४) राज्यस्तरीय सेवक, अधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्यासहित, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना. अनिल देशमुख, ना. हसन मुश्रीफ ना. विजय वडेट्टीवार, ना. सुनील केदार ना. यशोमती ठाकूर, ना. बच्चू कडू, ना. विश्वजीत कदम, नागपूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या राज्यस्तरीय मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने सदस्य सेवक, अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने राजूभाऊ पारवे, राजेश सोनपरोते राज्य महासचिव रूपेश पाल, देवराम नंदनवार, राज्य कोषाध्यक्ष मनीश पंचगाम, डॉ. आनंद पाटील तसेच ऑफोह संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधीर गटलेवार आणि उपजिल्हाध्यक्ष विनोद ढोरे यांनी केले आहे, यांच्यासह अन्य जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्यातील संख्या पदाच्या समस्या व इतर प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या