Thursday, April 25, 2024
Homeधुळेप्रतिज्ञापत्र, जातीचे प्रमाणपत्रासाठी 57 रुपये खर्च

प्रतिज्ञापत्र, जातीचे प्रमाणपत्रासाठी 57 रुपये खर्च

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

आपले सरकार सेवा केंद्रातून प्रतिज्ञापत्रासह जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी 57.20 रुपये तर उर्वरित सर्व शासकीय सेवांचा (प्रमाणपत्र) साठी 33 रुपये खर्च येणार आहे. यापेक्षा जास्त आकारणी

- Advertisement -

केल्यास सरकार सेवा केंद्र चालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल अशी माहिती नोडल अधिकारी आधार तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र येथून प्रतिज्ञापत्रासह जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी 57.20 रुपये, उर्वरित सर्व शासकीय सेवांचा दर 33.60 रुपये आहे.

नवीन आधार नोंदणी आणि बाल आधार पाच वर्षानंतर अद्यावत करणे, हाताचे ठसे, डोळ्यांचे बुबूळ यांचे बायोमेट्रीक अपडेशन करणे हे नि:शुल्क आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे आधार डेमोग्राफीक, बायोमेट्रीक अपडेट करणे, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर अपडेट करण्यासह हाताचे ठसे, डोळ्यांचे बुबूळ यांचे बायोमेट्रीक करण्यासाठी 100 रुपये, सर्वसामान्य नागरिकांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यांचे डेमोग्राफीक अपडेशनसाठी 50 रुपये आणि ई आधार डाऊनलोड करुन कलर प्रिंटसाठी 30 रुपये शुल्क आकारणी करता येईल.

शासन नियमाप्रमाणे निश्चित केलेल्या दराबाबत तसेच नागरिकांना शासकीय दरानुसार प्रमाणपत्र व इतर सर्व शासकीय सेवा मिळण्याबाबत आपले सरकार सेवा केंद्रांवर दर्शनी भागावर दर फलक लावणे आवश्यक आहे. असेही श्री. भामरे यांनी सांगितले.

शासकीय सेवांची यादी व सेवा देण्यास कालावधी याबाबतचा फलक देखील केंद्रावर लावणे बंधनकारक आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी करणार्‍या तसेच शासन नियमांचे पालन न करणार्‍या आपले सरकार सेवा केंद्र चालकाविरुध्द कार्यवाही करण्यात येईल. तसेच केंद्र देखील रद्द करण्यात येईल. असे श्री. भामरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या