Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रअ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड | Beed

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Advt. Gunratna Sadavarte) हे अटकेत आहेत. त्यानंतर अ‍ॅड. सदावर्ते (Advt. Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी आणखीनच वाढत आहे. त्यांच्याविरोधात बीडमध्ये (Beed) गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. ही तक्रार भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर (BJP City President Swapnil Galdhar) यांनी बीड पोलिसांत (Beed Police) दिली आहे.

- Advertisement -

यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला. त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.

याप्रकरणी सदावर्ते यांना तात्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे. डंके की चोट पर आम्ही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे देखील गलधर यांनी म्हटले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या