Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळ्यात 71 लिटर दूध आढळले भेसळयुक्त

धुळ्यात 71 लिटर दूध आढळले भेसळयुक्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी आज नियुक्त पथकाकडून अचानक 22 विक्रेत्यांकडील दुधाची तपासणी मंगळवारी करण्यात आली. त्यात 71 लिटर दुध भेसळयुक्त आढळून आले असून ते नष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्हात दुध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर संयुक्त पथक गठीत करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार गठीत करण्यात आलेल्या पथकाने आज अचानकपणे दशहरा मैदानाजवळ, शहरात खाजगी दुध पुरवठा करणारे, डेअरीमध्ये दुध पुरविणारे तसेच खाजगी वाटप करणार्‍या सुमारे 22 जणांंच्या दुधाची अचानकपणे तपासणी करण्यात आली.

एकुण एक हजार 165 लीटर (म्हशीचे 1100 दुध व गायीचे एकुण 65 लिटर) दुध तपासण्यात आले होते. त्यापैकी तीन विक्रेत्यांचे दुध मानदाप्रमाणे आढळून न आल्यामुळे एकुण 71 लिटर दुध कार्यवाही करून नष्ट करण्यात आले.

उर्वरित एक हजार 94 लिटर दुध हे मानदाप्रमाणे आढळून आल्यामुळे विक्रेत्यांना परत करण्यात आले.

ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी विजय सोनार, दुग्धशाळा रसायन शास्त्रज्ञ मनोज पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, नमुना सहाय्यक महादु गढरी, पोकाँ एन.एस. राठोड यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या