Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपात आजपासून प्रशासक राज

नाशिक मनपात आजपासून प्रशासक राज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत काल13 मार्च रोजी संपली, यामुळे आज 14 मार्चपासून नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक राजवट (Administrator Rule ) सुरू होणार आहे….

- Advertisement -

राज्य शासनाने महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव ( NMC Commissioner Kailas Jadhav ) यांची प्रशासक ( Administrator ) म्हणून यापूर्वीच नेमणूक केली आहे, दरम्यान शहर विकासाची कामे सुरूच राहणार, असे आयुक्त जाधव यांनी सांगितले आहे.

पहिले करोना त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेल्या गोंधळामुळे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक वेळेवर होऊ शकली नाही.

नाशिक महापालिकेत 2017 मध्ये निवडून आलेले सर्व नगरसेवक यांची मुदत काल 13 मार्च रोजी संपली आहे.

यामुळे तसेच वेळेत नवीन सदस्य निवडून न आल्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक राजवट लागू झाली आहे.

1992 मध्ये पहिल्यांदा नाशिक महापालिकेची निवडणूक झाली होती. यानंतर 1997, 2002, 2007, 2012 व 2017 मध्ये वेळेवर निवडणुका होऊन महापौर तसेच सर्व सदस्य सभागृहात आले होते, मात्र यंदा तसे झाले नाही यामुळे प्रशासक राजवट सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या