Friday, April 26, 2024
Homeराजकीयजिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

करोनाचा प्रादुर्भाव होवु नये यासाठी निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आदेश येई पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

- Advertisement -

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील माहे जुलै 2020 ते माहे डिसेंबर 2020 दरम्यान 27 ग्रामपंचायतींची मुदत समाप्त होत असल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात आले आहे.

देशात कोरोनाने थैमाण घाजला असुन त्यात महाराष्ट्रात प्रमाण अधिक असल्याने निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आदेश येई पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात जुलै 2020 ते माहे डिसेंबर 2020 दरम्यान 27 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करणे बाबत सुचना देण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी (पंचायत/कृषी/आरोग्य/शिक्षण) यांची मुळ कार्यभार सांभाळुन ग्रामपंचायतीची निवडणुक होई पर्यंत ग्रामपंचायतीचा दैनंदिनी कारभार व कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दि. 31 ऑक्टोंबर ते दि.8 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार तालुक्यातील भादवड,तलवाडे खुर्दे,वैंदाणे,कढरे, कार्ली,भालेर, हाटमोहिदा, खोंडामळी, कोपर्ली, खर्दे-खुर्दे, खोक्राळे, निंभेल, शनिमांडळ, मांजरे,नगांव,विखरण, काकर्दे, बलदाणे, तिलाली, सिंदगव्हाण, न्याहली,आराळे, तळोदा तालुक्यातील रेवानगर,सरदार नगर,नर्मदानगर, रोझवा पुर्नवसन, अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. व तसा अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी दिला आहे.

प्रशासक म्हणुन श्रीमती. टी.एस.पाटील(भादवड,बलदाणे), सागर आर. राजपुत (तलवाडे खुर्दे), एस.बी.गोसावी (वैंदाणे), वाय.एस.हिवराळे (कढरे, निंभेल), बी.डी.निकुंभे (कार्ली, हाटमोहिदा, मांजरे), वाय,डी,पवार (भालेर, नगांव), एस.एन.पाटील (खोंडामळी, विखरण), सागर.आर. राजपुत (कोपर्ली, शनिमांडळ, तिलाली), एस.बी.गोसावी(खर्दे-खुर्दे ), एन.जी.पाटील (खोक्राळे, न्याहली), डी.जी.वसावे (काकर्दे, सिंदगव्हाण), एम.जी.विसपुते (आराळे), आर.के.जाधव (रेवानगर, नर्मदानगर), जे.डी.पराडके (सरदार नगर, रोझवा पुर्नवसन), एन.के. बिर्‍हाडे (देवमोगरा) यांची नेमणुक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या