Wednesday, April 24, 2024
Homeनगरपुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रास प्रशासकीय, वित्तीय मान्यता

पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रास प्रशासकीय, वित्तीय मान्यता

पारनेर (तालुका प्रतिनिधी) –

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रास

- Advertisement -

प्रशासकीय व वित्तीय मान्यता राज्याचे उपसचिव अजित बाविस्कर यांनी दिली आहे.

आ. निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी मागणी केली होती. त्यामुळे शासनाच्यावतीने 22 जानेवारी रोजी अध्यादेश काढला आहे. पुणे विद्यापीठाच्या नगर येथील केंद्रास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाल्याने विद्यार्थी व प्राध्यापकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. महाराष्ट्रात व देशपातळीवरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक नावाजलेले विद्यापीठ आहे. आजमितीला विद्यापीठाशी 883 महाविद्यालये व 77 संशोधन केंद्र संलग्न असून या सर्व संलग्न संस्थामधून सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्य व पालक या सर्वांचा विद्यापीठाशी सातत्याने संबंध येतो.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 122 महाविद्यालये 23 मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्था व 7 संशोधनकेंद्र ज्ञानदानाचे काम करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय व वित्तीय मान्यतेअभावी या उपकेंद्रांची ज्या हेतूने निर्मिती करण्यात आली तो हेतू साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे उपकेंद्रांना शासन मान्यता मिळावी. म्हणून विद्यापीठाच्यावतीने 2008 पासून वेळोवेळी प्रस्ताव दाखल करण्यात आले. अंतिम प्रस्ताव 2011 मध्ये सादर करण्यात आला व अनेक पाठपुराव्यानंतर 13 ऑगस्ट 2014 रोजी 179 व्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपकेंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात 90 शिक्षकपदे व 179 शिक्षकेतर कर्मचारी पदे आणि महसुली व भांडवली खर्चाचा समावेश होता. मात्र त्यासंबंधीचा आदेश पारित झाला नाही.

पुढे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. उपकेंद्र 2012/ प्र.क्र.280/विशि.3 दि. 28 एप्रिल 2015 रोजी राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत आवश्यक उपकेंद्राच्या निर्मितीसाठी अभ्यास करून समान धोरण निश्चित करण्यासाठी एक समिती डॉ. योगानंद काळे, प्र-कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली एवढेच अहमदनगर जिल्ह्याचा विकास व विद्यार्थी हिताच्या व सोयीच्यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक उपकेंद्राच्या रखडलेल्या प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यासंबंधीचा आदेश पारित करावा, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या