Thursday, April 25, 2024
Homeजळगावदुध संघावर खडसे विरोधकांचे प्रशासक मंडळ नियुक्त

दुध संघावर खडसे विरोधकांचे प्रशासक मंडळ नियुक्त

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

येथील जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Union) संचालक मंडळाचा (Board of Directors) कार्यकाळ संपुष्टात आल्याने तसेच दुध संघाबाबत बर्‍याच तक्रारी (Complaints) असल्याकारणाने संचालक मंडळ बरखास्त (Dismissal of the Board of Directors) करण्याचे आदेश दुग्ध विकास व्यवसाय विभागाच्या उपसचिवांनी (Deputy Secretary of Dairy Development Business Department) दिले आहेत. दुध संघावर 11 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त (Board of Directors appointed) करण्यात आले असून यात आमदारांसह त्यांच्या स्विय्य सहायकांचाही समावेश आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा 5 वर्षाचा कालावधी तसेच तद्नंतर महाराष्ट्र सहकारीसंस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 मधील तरतूदीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. नविन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी घ्यावयाच्या निवडणूका दि. 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

या दूध संघाबाबत बर्‍याच तक्रारी प्राप्त झाल्या असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार समितीमार्फत चौकशी सुरु झाली आहे. ही चौकशी निष्पक्ष व्हावी या उद्देशाने दुध संघावर कार्यरत असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश उपसचिवांनी दिले आहेत. तसेच निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत 11 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहे.

असे आहे प्रशासक मंडळ

प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, अजय एकनाथ भोळे (भुसावळ), अमोल चिमणराव पाटील, अरविंद देशमुख, राजेंद्र राठोड, अशोक कांडेलकर, गजानन पाटील (धरणगाव), अमोल शिंदे (पाचोरा), विकास पंडीत पाटील (भडगाव), यांचा समावेश आहे.

प्रशासक मंडळावर खडसे विरोधकांची छाप

जिल्हा दुध संघात खडसेंना अडचणी आणण्यासाठी जे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे त्यावर भाजपाचे आमदार गिरीश महाजन समर्थक आणि खडसे विरोधकांची छाप दिसून येत आहे. प्रशासक मंडळातील अनेक जणांचे एकनाथराव खडसे यांचे अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष राजकीय वैर राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या