Wednesday, April 24, 2024
Homeजळगावअतिरिक्त भाराच्या ओझ्याखाली गुदमरतोय औषध निरीक्षकाचा जीव

अतिरिक्त भाराच्या ओझ्याखाली गुदमरतोय औषध निरीक्षकाचा जीव

जिल्ह्याच्या 45 लाख लोकसंख्येचा भार फक्त एका औषध निरीक्षकावर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

- Advertisement -

जिल्ह्यात तीन औषध निरीक्षक व एका सहाय्यक आयुक्ताचे पद मंजूर असतांना देखील निव्वळ एकाच औषध निरीक्षकावर 45 लाख लोकसंख्येचा भार असल्याबाबतचे वृत्त दै. देशदूतने शनिवारी प्रकाशित केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्र तसेच औषध व्यवसायाशी संबंधितांच्या तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात सध्या चार ऐवजी फक्त एकच आरोग्य निरीक्षक कार्यरत असल्याने औषध दुकानांचे नवीन परवाने, नूतनीकरण खोळंबले आहे. एकाच व्यक्तिवर सर्व प्रकारचा भार असल्यामुळे औषध विक्री करणार्‍या दुकानांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच शासनाने कार्यरत असलेल्या एकाच निरीक्षकावर कोरोनाच्या काळातील आवश्यक साधन सामुग्रीचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोपविल्याने औषध विक्री दुकानांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात.

सुनिल भंगाळे,अध्यक्ष, मेडिकल डिलर्स असोसिएशन

45 लाख लोकसंख्येचा विचार करुन शासनाने जिल्ह्यासाठी तीन औषध निरीक्षकांची पदे मंजूर असतांनाही प्रशासनाने भोंगळ कारभार करीत यातील दोघा निरीक्षकांची बदली केली.

त्यासोबतच सहाय्यक आयुक्तांची देखील बदली करण्यात आली. मात्र गेल्या पाच महिन्यापासून ही पदे रिक्तच ठेवण्यात आल्यामुळे कोरोनाच्या काळात एकाच औषध निरीक्षकावर सर्व भार आला.

अतिरिक्त भाराच्या ओझ्याखाली त्या औषध निरीक्षकाचा जीव गुदमरत असतांना देखील प्रशासनाला मात्र याच्याशी काही देणेघेणे उरलेले नाही.

सर्व कामे एकाच व्यक्तिला बघावे लागत असल्याने त्याचा परिणाम औषध दुकानांचे परवाने नुतनीकरणासोबतच न्यायालयीन खटल्यांवरही झाला आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर कामे खोळंबली आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्वच विभागांमध्ये मनुष्य बळाची कमतरता असल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असतांना देखील दुकानांच्या तपासण्या, भेसळवरील कारवाया होत नसल्याचे चित्र आहे. प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून झोपी गेल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या