Friday, April 26, 2024
Homeनगरपाचेगावात जागा बदलून भरणार्‍या बाजाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पाचेगावात जागा बदलून भरणार्‍या बाजाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

जिल्हाधिकारी यांनी 15 एप्रिलपर्यंत सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र गेल्या मंगळवारी (30 मार्च) पाचेगावात जागा बदलून बाजार भरवला गेला.

- Advertisement -

स्थानिक प्रशासनाने यास कोणतीच आडकाठी आणली नाही. या प्रकारामुळे करोना प्रसार रोखला जाणार कसा? असा प्रश्न पडला आहे.

गावात नागरिक विना मास्क व सोशल डिस्टर्न्सींज्ञ वापर करताना दिसत नाही. पाचेगावात मागील आठवड्यात आठवडे बाजार बंद सांगण्यात आला असताना देखील बाजाराची जागा बदलून व्यापारी वर्गाने बाजार भरवला. विनामास्क व सोशेल डिस्टन्सचा वापर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने याबाबत काहीतरी निर्णय घेण्याची गरज असताना, कोणतीही भूमिका घेतली नाही.

पाचेगावात सकाळी बाजारतळावर गर्दी उसळत आहे. ही गर्दी थांबविण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन विनाकाम व विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.

बाजारकरू व व्यापारी वर्ग, शेतकर्‍यांना गल्लीबोळात फिरून आपला भाजीपाला विकण्यास सांगावे. त्यामुळे गर्दी होणार नाही. गावातील किराणा दुकान, शीतपेय व इतर दुकानांना वेळ लागू करण्यात यावी. गावातील दारू दुकानांवर अंकुश ठेवण्यात यावा. गावातील जुगार व मटका हे देखील बंद करण्यात यावे.

गावातील नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, गावात गर्दी टाळावी. वेळोवेळी मास्कचा वापर करावा व वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत सॅनिटायजरचा वापर करावा,असे नागरिकांनी अंमलात आणले तर मोठी मदत होईल व पुढील अनर्थ टळला जाऊ शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या