Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनAdipurush : वादात अडकूनही ‘आदिपुरुष’ ने पहिल्याच दिवशी कमावले १५० कोटी, हे...

Adipurush : वादात अडकूनही ‘आदिपुरुष’ ने पहिल्याच दिवशी कमावले १५० कोटी, हे कसं घडलं?

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांनी तिकीट बुकिंगसाठी गर्दी केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी गर्दी झाल्याने साईटही क्रॅश झाली होती. ‘रामायणा’चा मॉडर्न अवतार असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी तरी पसंती दिल्याचं चित्र आहे.

- Advertisement -

अॅडव्हान्स बुकिंग पाहिल्यानंतर चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. शुक्रवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे. त्यावरुन प्रभासच्या स्टारडमने चित्रपटाला अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करण्यात मदत केल्याचं दिसत आहे. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभास पॅन इंडिया स्टार झाला असून, त्याचा फायदा आदिपुरुष चित्रपटाला झाला आहे. दरम्यान, प्रभासला तेलुगू प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. आदिपुरुष चित्रपटाचं ओपनिंग कलेक्शन पाहता हिंदीपेक्षा तेलुगू व्हर्जनमध्ये जास्त कमाई झाली आहे.

संगमनेरात ‘लव जिहाद’चा प्रयत्न फसला

मीडिया रिपोर्टनुसार, आदिपुरुष सिनेमाच्या हिंदी वर्जनसाठी १३ करोडहून अधिक अॅ़डवांस ग्रॉस कलेक्शन मिळालं होते. तर तेलुगू वर्जनमधून देखील १२ करोडहून अधिक ग्रॉस कलेक्शन मिळालं आहे. त्यामुळे आदिपुरुषने अ़ड़वांस बुकींगमध्ये आधीच ३० करोड रूपये ग्रॉस कलेक्शन पार केले होते. त्यामुळे हा सिनेमा ७५ ते ८० करोड रूपयांपर्यत कलेक्शन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मीडिय़ा रिपोर्टनुसार, आदिपुरूषने पहिल्या दिवशी ८७ ते ९० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तसेच विदेशात २००० स्क्रिनवर रिलीज झालेल्या आदिपुरुषने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे परदेशातील एकूण कलेक्शन पाहता ते ३५ ते ४० कोटी रुपये असू शकते. म्हणजेच, भारत आणि विदेशातील अंतिम आकडेवारी पाहता ‘आदिपुरुष’चे एकूण जगभरातील कलेक्शन १५० कोटी रुपयांच्या अगदी जवळ पोहोचू शकते, असा अंदाज आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक अन् मारहाण; Video शेअर करत म्हणाल्या…

दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कलाकारांचे लूक्स, व्हीएफएक्स आणि डायलॉगवरून प्रेक्षक संतापले आहेत. त्यामुळे चित्रपट वादातही अडकला आहे. असं असूनही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. परिणामी शनिवार व रविवार या दिवसांत चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होईल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या