Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककरोनामुळे अधिक मासावर विरजण; जावयांचा हिरमोड

करोनामुळे अधिक मासावर विरजण; जावयांचा हिरमोड

ओझे | विलास ढाकणे

भारतीय संस्कृतीमध्ये काही महिन्यांना पर्वकाळाचे व पवित्र महिने समजले जातात. त्यात श्रावण व अधिक महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो. यंदाचा अधिक मास नुकताच सुरु झाला आहे. परंतु करोनामुळे या महिन्यावर विरजण पडल्यामुळे सर्वञ नाराजीचे सुर निघत आहेत.

- Advertisement -

अधिक मासाला मलमास पुरूषोत्तम मास ,किंवा ग्रामीण भागात या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. या मासाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या महिन्यात जावयांना विशेष मान दिला जातो.

अधिक मासामध्ये जेवढे पुण्य कर्म केले. तेवढे जास्त फल प्राप्त होते. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या पुजाविधी, दान, पुण्य कर्म, इ.करण्याची पध्दती आहे.

तसेच पूर्वापार आलेली रित म्हणजे जावई घरी बोलवून त्यांना वेगवेगळ्या वस्तूचे दान दिले जाते. नवविवाहितांना सासर कडून वस्ञदान भेटवस्तू, सोने, तांबे, इ. धातूपासून बनविलेल्या वस्तूचे वाण दान दिले जाते. दिपदान वेगवेगळ्या गोड वस्तूचे ही दान देण्याची परंपरा रूढ आहे.

परंतु दर तीन वर्षांनी येणारा आधिक मास यंदा करोनाच्या काळात आल्यामुळे यंदा जावई वर्गाला विविध स्वरुपाच्या भेट वस्तू व पाहुणचारांला यंदा मुकावे लागणार असल्यामुळे जावयांचा हिरमोड झाला आहे.

दिवसेंदिवस करोनाचा वाढता प्रभाव, लाॅकडाऊनची स्थिती, सध्याचे आर्थिक संकट, घर खर्चाचा वाढलेला आर्थिक भार इ.चा परिणाम सर्वञ दिसून येत असल्यामुळे यंदा सर्व गोष्टीवर विरजण पडले आहे.

त्यामुळे यंदाचा धोंड्याचा महिना जावयांना विनादानामुळे सुना-सुना जाणार असल्याचे चिञ दिसत आहे. अधिक महिन्यात दानाला विशेष महत्त्व दिले गेल्याने हा पुर्ण महिना दानाचा महिना म्हणून ओळखला जातो.

महिलांना या महिन्यात वाण देण्याची प्रथा आहे. त्यात ऐपती सोने, चांदी इ.पासून बनविलेल्या वस्तूचे दान दिले जाते. विशेष करून पायातील चांदीचे जोडवे जास्त करून वाण म्हणून मोठ्या प्रमाणावर दिले जातात.

त्यासाठी या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी असते. तसेच नवविवाहित जोडप्यांना विशेष निमंत्रण देऊन अनेक पदार्थ दान केले जातात. त्यात अनारसे हा तांदळांपासून बनविलेला पदार्थ मोठ्या प्रमाणावर दान दिला जातो.

अधिक मासात बाजारपेठेमध्ये ग्राहक वर्गाला विशेष सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी ऑफर दिल्या जातात. त्यासाठी सराफांची दुकाने, विशेष मिठाई बनविणारे दुकाने यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्गाची रेलचेल असते. परंतु, यंदा कोरोना मुळे या गोष्टीवर विरजण पडण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या