Thursday, April 25, 2024
Homeनगरआढळाचा ओव्हरफ्लो चिकणीच्या ओढ्यात

आढळाचा ओव्हरफ्लो चिकणीच्या ओढ्यात

संगमनेर (प्रतिनिधी) –

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या परिसराकरिता अनेकवेळा आढळा नदीतील ओव्हरफ्लोचे पाणी चिकणी व परिसरातील गावांकरिता रोहित ओढ्यात आणले होते.

- Advertisement -

महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने आढळा नदीचे ओव्हरफ्लोचे पाणी सतराशे फूट लांब व दोनशे फूट व्यासाच्या पाईपलाईनद्वारे चिकणी परिसरातील रोहित ओढ्यात सोडण्यात आले आहे.

चिकणी येथे ओव्हरफ्लो पाणी सोडण्याचा शुभारंभ थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटवळ, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, रोहिदास पवार , भारत वर्पे, सरपंच शिवाजी वर्पे, उपसरपंच गोरख वर्पे, दत्तात्रेय वर्पे, शिवाजी मुटकुळे, जलसंपदा विभागाचे अधिकारी आर.एम. देशमुख, कवडे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या परिसराकरिता अनेकवेळा आढळा नदीतील ओव्हरफ्लोचे पाणी चिकणी व परिसरातील गावांकरिता रोहित ओढ्यात आणले होते. याच उपक्रमाचा आदर्श घेऊन नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजीत थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे सतराशे फूट लांब व व दोन फूट व्यासाची पाईपलाईनद्वारे हे पाणी चिकणी ओढ्यात यावर्षी सोडले आहे. यामुळे या परिसरातील शेती व शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार असून पाणीपातळी वाढली आहे.

या प्रसंगी इंद्रजीतभाऊ थोरात म्हणाले की, यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी वाहून जाणारे पाणी आपण इतरत्र वळवल्याने त्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना होणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील पाणी पातळीची वाढ होणार आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक ओढ्यावर नदीवर सिमेंट बंधार्‍यांची साखळी निर्माण केली असून त्यामुळे तालुका जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यावर्षी पाणी पाऊस चांगला आहे त्यामुळे हे पाणी जास्तीत जास्त घेऊन शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे लक्ष दिले पाहिजे व उर्वरित भागातही पाणी कसे पोहोचता येईल यासाठी कारखान्याच्या माध्यमातून नियोजन केले जात असल्याचेही ते म्हणाले

बाबा ओहोळ म्हणाले की, ऊस हे शाश्वत पीक आहे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने ऊसाला कायम उच्चांकी भाव दिला आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्याने सर्व शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस पिकाची लागवड करावी आधुनिक पद्धतीने ऊस पिकाची लागवड केल्यास एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेऊन कमी श्रमात जास्त नफा शेतकर्‍यांना मिळणार आहे यावेळी संतोष हासे, विष्णुपंत रहाटळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक दूध संघाचे संचालक विलासराव वर्पे यांनी केले. स्वागत दत्तात्रय वर्पे यांनी केले तर पांडुरंग वर्पे यांनी सूत्रसंचालन केले आणि शिवाजी मुटकुळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या