Wednesday, April 24, 2024
Homeनगरआढळा धरण ९० टक्के भरले

आढळा धरण ९० टक्के भरले

देवठाण |वार्ताहर| Devthan –

अकोले तालुक्यातील देवठाण येथील १०६० द.ल.घ.फु क्षमता असलेले आढळा धरण शुक्रवारी रात्री ९७५ दलघफू भरले आहे.

- Advertisement -

सांडपात्रात पाणी दाखल झाले असून रविवारी धरण भरून वाहू लागणार इतकी पाण्याची आवक चालू आहे.

अकोले,संगमनेर व सिन्नर या तीन तालुक्यातील पंधरा गावातील शेतीसाठी याच धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो त्यामुळे धरण कधी भरणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या