Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…”; लाल किल्ल्यावरून PM मोदींनी फुंकले...

“पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…”; लाल किल्ल्यावरून PM मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित केले. लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात एनडीए सरकारने केलेल्या कामांचा हिशोब दिला. पुढील स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना देशाच्या विकासाचे, संकल्पाचे गौरवगान करेन, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले, २०१४ मध्ये मी बदल घडवून आणण्याचे वचन दिले होते. तुम्ही देशवासीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. २०१९ मधील कामगिरीच्या जोरावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिलात. बदलामुळे मला आणखी एक संधी मिळाली. मी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करीन, असा विश्वास त्यांनी केला. तसेच, २०४७ चे स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण म्हणजे येणारी पाच वर्षे. पुढच्या वेळी १५ ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश आणि विकास मांडणार आहे. येत्या १५ ऑगस्टला पुन्हा येईल. मी फक्त तुमच्यासाठी जगतो. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन वाईट गोष्टींविरुद्ध लढणे ही काळाची गरज आहे. मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहीन. कुटुंबवादाने आपला देश हिरावून घेतला आहे. तिसरे वाईट म्हणजे तुष्टीकरणाचे. त्यामुळे आपल्या देशाला डाग लागला आहे. या तिन्ही वाईट गोष्टींविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढायचे आहे. या वाईट प्रवृत्तींपासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या