Friday, April 26, 2024
Homeनगरशिस्तीत कारभार करा

शिस्तीत कारभार करा

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्हा बँक चालविणे सोपे नाही. बँकेचे कामकाज हे चाकोरीत, शिस्तीत केले पाहिजे. संचालकांनी भिडस्तपणाला

- Advertisement -

आवर घालण्याची गरज असून नियमात राहुन बँकेचा कारभार करणाची गरज आहे. यापुढे नूतन पदाधिकारी आणि संचालकांनी बँकेची थकबाकी कशी कमी करता, यासाठी प्रयत्न करावे, या शब्दात बँक हिताच्या सल्ल्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन संचालकांना कानपिचक्याही दिल्या.

जिल्हा बँंकेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर महसूल थोरात बँकेच्या मिटींग हॉलमध्ये बोलत होते. यावेळी मंत्री शंकरराव गडाख, नूतन चेअरमन उदय शेळके, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, माजी चेअरमन सीताराम पाटील गायकर, संचालक शिवाजीराव कर्डिले, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, आ. आशुतोष काळे, आ. मोनिकाताई राजळे, विवेक कोल्हे, राहुल जगताप, अनुराधाताई नागवडे, अण्णासाहेब म्हस्के, अरूण तनपुरे, अंबदास पिसाळ, करण ससाणे, अमोल राळेभात, अमित भांगरे, गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, आशा तापकिर यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महसूल मंत्री थोरात म्हणाले, जिल्हा बँकेला मोठी परंपरा आहे. शेती आणि कारखानदारीच्या विकासात बँकेचा वाटा आहे. आधीच्या नेतृत्वाने कुटूंबाप्रमाणे बँकेचा संभाळ केला. विद्यमान संचालक मंडळात नव्या जुन्यांचा मेळ घालण्यात आलेला आहे. आधी 17 जागा बिनविरोध काढणे हे ऐतिहासीक आहे. बँकेचे चेअरमन शेळके यांनी महानगर बँकेच्या माध्यमातून आपली वारसदारी सिध्द केलेली असून कानवडे यांचा सहकारात दांडगा अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेत चेअरमनपदावर तरूण असणारे शळके तर व्हाईस चेअरमन पदावर अनुभवी ज्येष्ठ असणार्‍या कानवडे हे पदाधिकारी मिळाले आहेत. येणारा काळ हा बँकिंग क्षेत्राला आव्हान असणारा काळ असून बँक चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते, असे प्रतिपादन मंत्री गडाख यांनी केले. यावेळी नूतन चेअरमन शेळके आणि व्हाईस कानवडे यांचे मनोगत झाले.

……………….

उपस्थितीसाठी वार बदला

जिल्हा बँकेत संचालकांनी दर आठवड्याला उपस्थित राहणे आवश्यक आहे. या संचालक मंडळात काही आमदार असून त्यांना मंगळवारी मुंबईला जावे लागते. यामुळे बँकेत दर आठवड्याला हजर राहण्यासाठी संचालक मंडळाने आपआपसात बसून चर्चा करून दुसरा वार ठरवून घ्यावा, अशी सुचना मंत्री थोरात यांनी केली. तर नूतन अध्यक्ष शेळके यांनी हे संचालक मंडळ शिस्तीने कामकाज करेल. मात्र, बँकेवर लक्ष राहू द्या अशी विनंती त्यांनी थोरात यांना केली. आपले लक्ष राहिल्यावर आमची पावले इकडे तिकडे जाणार नाही, असे ते ना.थोरात यांना म्हणाले.

………………

- Advertisment -

ताज्या बातम्या