Tuesday, April 23, 2024
Homeजळगावपती-मुलावर अंत्यसंस्कार सुरु असतांनाच मालवली पत्नीची प्राणज्योत

पती-मुलावर अंत्यसंस्कार सुरु असतांनाच मालवली पत्नीची प्राणज्योत

आर्थिक विवंचनेतुन बाप लेकाची विष घेऊन आत्महत्या

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

- Advertisement -

एकीकडे पतीसह मुलावर अंत्यसंस्कार आटोपून कुटुंबिय घरी परतत असतांनाच रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

एकाच कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरातील आदर्श नगरातील दीपक रतीलाल सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासोबत वास्तव्यास होते.

सोनार दाम्पत्यांचा मुलगा परेश हा गतीमंद असल्याने पती -पत्नी दोघे सोन्याला पॉलिश देवून आपल्या संसाराचा गाडा ओढत होते.

दिवस उजाडला की मुलाला घेवून ते सराफ बाजारातील आपल्या दुकानावर निघून जात आणि काम आटोपले की घरी येत अशी त्यांची दिनचर्या होती.

सोमवारी श्रद्धा सोनार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्यांना न्युमोनिया असल्याने निदान करण्यासाठी उपचार सुरु केले होते.उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला.

पत्नीच्या उपचाराची पतीला चिंता

दोन दिवसांपासून श्रद्धा सोनार यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयाकडून दोन दिवसांचे बिल हे दीड लाख रुपये इतके काढले होते. दीपक सोनार यांनी जमा केलेली जमापुंजीची रक्कम ही रुग्णालयात भरुन टाकली. परंतु श्रद्धा सोनार यांना अजून काही दिवस उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागणार होते. परंतु सोनार यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना पत्नीच्या पुढील उपचारासाठी लागणार्‍या पैशांबाबत चिंता लागून होती.

बाप- लेकांनी घेतले विष

एकीकडे पत्नीवर उपचार सुरु असतांना त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासाळत असल्याने दीपक सोनार हे प्रचंड तणावात होते. पत्नी सोडून गेल्यानंतर आपले कोण करेल? त्यातच मुलगा गतीमंद असल्याने त्याची संपुर्ण जबाबदारी कोण घेईल यातूनच दीपक सोनार यांनी आपल्या मुलाला विषारी द्रव्य दिले त्यानंतर त्यांनी स्वत: प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपविली.

..अन् सोनार कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डाेंंगर

आज सकाळी दोघं पिता-पुत्रांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी अकरा वाजेच्या सुमारास आदर्श नगरातून एकाचवेळी पिता-पुत्राची अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात होता. त्या दोघांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक हे घराकडे परतत असतांनाच त्यांना रुग्णालयातून श्रद्धा सोनार (वय 60 ) यांची प्राणज्योत मावल्याचा फोन आला आणि पुन्हा सोनार कुटुंबीयांवर जणूकाही दु:खाचा डोंगर कोसळला.

रात्रीतून झालं होत्याचं नव्हतं

सोनार कुटुंबिय हे समाजात आणि परिसरात एक शांतता प्रिय म्हणून त्यांची ओळख होती. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने उतार वयात देखील पती-पत्नी हे दोघेही सोनारी काम करून उदनिर्वाह करीत होते. याचत मुलगा गतीमंद असल्याने सकाळी दुकानावर त्याला सोबत घेवून जात आणि रात्रीच ते घरी येत असत. मात्र एका रात्रीत संपूर्ण कुटुंबच होत्याचं नव्हतं झाल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घर बंद असल्याने शेजारच्यांनी दाखविली माणुसकी

सोनार हे मूळचे नंदूरबार येथील असून ते कामानिमित्त जळगावात स्थायिक झाले. याठिकाणी सराफ बाजारात सोन्याला पॉलिश करुन देण्याचे काम करीत होते. रात्री घडलेल्या घटनेमुळे त्यांचे घर पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी सील केले होते. त्यामुळे शेजारी राहणार्‍या नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागा देत माणुसकीचे दर्शन घडविले. त्यानंतर दुपारी श्रद्धा सोनार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या