Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसांसद आदर्श ग्राम योजनेला तीन वर्षांपासून निधीच नाही

सांसद आदर्श ग्राम योजनेला तीन वर्षांपासून निधीच नाही

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये पहिल्या टप्यात खासदारांना सांसद आदर्श ग्राम योजनेतून गाव दत्तक घेत ती गावे विकसीत केली आहे. दुसऱ्या टप्यातही या योजनेतंर्गत गावे दत्तक घेण्यात आली.

- Advertisement -

दत्तक गावांचा विकास आराखडा मंजूरही झाला. मात्र, तीन वर्षांपासून या योजनेला निधी नाही, अशी तक्रार दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. गाव विकासासाठी निधी मिळावा,अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.

माजी खासदार चव्हाण यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की,पहिल्या टप्यात खासदार असताना सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत दिंडोरी तालुक्यातील अवनखडे गाव दत्तक घेतले होते. गावाचा विकास आराखडा मंजूर करून गाव विकसीत केले. देशातील पहिल्या १० गावांमध्ये अवनखेड या गावाचा समावेश झाला होता.

दुसऱ्या टप्यातही मार्च २०१७ मध्ये या योजनेतंर्गत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा तालुक्यातील मानगव्हाण गाव दत्तक घेण्यात आले. गाव दत्तक घेतल्यानंतर तेथील विकासबाबत आराखडा तयार करून मंजूर करण्यात आला.

मात्र, तीन वर्ष उलटूनही गावात कामे सुरू झालेली नाही. जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन कामांना सुरूवात करण्याची मागणी देखील केली. मालगव्हाण हे आदिवासी गाव असून, विकासकामे सुरू होत नसल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यासाठी केंद्र स्तरावरून या योजनेतंर्गत मंजूर कामांना तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणीही चव्हाण यांनी पत्रात केली आहे.

मालगव्हाण (ता. सुरगाणा) गाव विकासबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्यापही मंजुर कामांना सुरूवात झालेली नाही. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र दिले आहे.

हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -

ताज्या बातम्या