Saturday, April 27, 2024
Homeजळगावआदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगाव । jalgaon

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जिल्हा परिषदेकडून आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर होवूनही वितरीत होवू शकले नाही. मात्र, यंदा सलग तीन वर्षाचे पुरस्कार 5 सष्टेंबर रोजी वितरीत करण्यात येणार आहे. तत्पुर्वी जिल्हा परिषदेने अर्ज प्राप्त शिक्षकांच्या मुलाखती घेवून नाशिक विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी 15 शिक्षकांची यादी पाठविली होती. त्यास मान्यता मिळाली आहे. दरम्यान, यावर्षी 15 पुरस्कारामध्ये 7 महिला शिक्षकांचा समावेश आहे. यंदा शिक्षक दिनी 45 शिक्षकांना पुरस्कार वितरण जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्याभरातून यंदा 26 शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते. या प्राप्त अर्जांची छाननी करुन पात्र शिक्षकांच्या 24 ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी पात्र 15 शिक्षकांची यादी मंगळवारी जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक डॉ.पंकज आशिया व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी नाशिक विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविली होती. त्यास मान्यता मिळाल्याने सलग तीन वर्षाचे अर्थात प्रत्येक तालुक्यातून 3 शिक्षकांना यावर्षी यंदा 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी पुरस्कार वितरणाचा मुहूर्त लाभणार आहे.

दोन्ही मंत्र्यांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती

जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील,खा.रक्षा खडसे,खा.उन्मेष पाटील,तसेच जिल्हयातील सर्व विधानसभा सदस्य,विधान परिषद सदस्य,शिक्षक आमदार,पदवीधर आमदार,महापौर मनपा,जळगाव यासह जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, सीईओ डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे,जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

तालुकानिहाय जाहीर झालेले पुरस्कार

दर्शना चौधरी (जि.प. शाळा शिरूड,ता.अमळनेर), मनिषा अहिरराव (जि.प. शाळा, भडगाव), रविंद्र पढार (जि.प शाळा मांडवेदिगर), मनिषा कचोरे (जि.प शाळा मनुर),उत्तम चव्हाण (जि.प.उच्च प्राथ.शाळा शिवापूर) विश्वनाथ पाटील (जि.प. शाळा नागलवाडी), संजय गायकवाड (जि.प शाळा मुसळी,ता.धरणगाव), लक्ष्मण कोळी (जि.प शाळा चंदनबर्डी,ता.एरंडोल), ललिता पाटील (जि.प. मुलींची शाळा कानळदा,ता.जळगाव), किर्ती घोेंगडे (जि.प प्राथ.मुलींची शाळा पहूर कसबे,ता.जामनेर), विजय चौधरी (जि.प. शाळा पिंप्रीनांदू, ता.मुक्ताईनगर), अरुणा उदावंत (जि.प. शाळा राजुरी,ता.पाचोरा), छाया भामरे (जि.प शाळा मोंढाळे,ता.पारोळा), रामराव मुरकुटे (जि.प. शाळा खिरोदा प्रचा,ता.रावेर),समाधान कोळी (जि.प केंद्र शाळा साकळी,ता.यावल) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या