मुंबई –
अभिनेत्री कतरिना कैफ ला करोनाचा संसर्ग झाला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने तिला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली
आहे.
‘माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाइन आहे आणि कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन तिने केले आहे. चाहत्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असेही ती म्हणाली आहे.
दरम्यान, बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये गोविंदा, अक्षय कुमार, आलिया भट्ट, आमिर खान, परेश रावल, रणबीर कपूर, संजय लीला भंसाली, सतीश कौशिक, विकी कौशल, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, तारा सुतारिया अशा अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. तर गेल्या वर्षीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली होती. ज्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा या सेलिब्रेटींचा समावेश होता. दरम्यान करोनाच्या काळात बॉलिवूडला बरंच नुकसान सोसावं लागलं आहे. बॉलिवूडवरील करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.