Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधअभिनेते ते राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की!

अभिनेते ते राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की!

झेलेन्स्की यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी क्रिव्ही रिह येथे सामान्य कुटुंबात झाला. अभिनय कारकिर्दीपूर्वी त्यांनी कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी विनोटी कलावंत म्हणून करिअर केले आणि ‘क्वार्टल 95’ या नावाची टी व्ही मालिका निर्मिती कंपनी तयार केली. या टीव्ही मालिकेत ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ यासह चित्रपट, व्यंगचित्रे आणि टीव्ही शो तयार केले. ज्यामध्ये झेलेन्स्की यांनी युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांची भूमिका साकारली. ही मालिका 2015 ते 2019 पर्यंत प्रसारित झाली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. ‘क्वार्टल 95’ च्या कर्मचार्‍यांनी मार्च 2018 मध्ये टीव्ही शोच्या नावानेच ‘क्वार्टल 95’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

झेलेन्स्की यांनी 2019 च्या अध्यक्षीय निवडणुकीत 31 डिसेंबर 2018 च्या संध्याकाळी टीव्ही चॅनेल 1+1 वर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांच्या नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या भाषणासोबत आपली उमेदवारी जाहीर केली. झेलेन्स्की एक राजकीय नवीन चेहरा व बाहेरचा माणूस असून सुद्धा ते युक्रेनमधील निवडणुकीच्या ओपिनियन पोलमध्ये आघाडीवर होते. झेलेन्स्की यांनी दुसर्‍या फेरीत राष्ट्राध्यक्ष्य पोरोशेन्को यांचा पराभव करत त्यांनी 73.23 टक्के मते मिळवून निवडणूक जिंकली. त्यांनी स्वतःला प्रस्थापित विरोधी आणि भ्रष्टाचार विरोधी व्यक्तिमत्व म्हणून स्थान दिले व प्रस्तुत केले.

- Advertisement -

अध्यक्ष या नात्याने, झेलेन्स्की हे ई-गव्हर्नमेंटचे आणि देशाच्या लोकसंख्येच्या युक्रेनियन- आणि रशियन-भाषिक भागांमधील एकतेचे समर्थक आहेत. त्यांची संवाद शैलीची मोहिनी जनतेवर मोठी आहे त्यात झेलेन्स्की सोशल मीडिया व विशेषतः इंस्टाग्रामचा व्यापक प्रमाणावर वापर करतात. झेलेन्स्की यांनी त्यांच्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान ते म्हणाले की त्यांनी युक्रेनच्या युरोपियन युनियन आणि नाटोचे सदस्य होण्यास पाठिंबा दिला होता, परंतु तो निर्णय युक्रेनच्या मतदारांनी सार्वमताने घ्यावा. त्याच वेळी, त्यांचा असा विश्वास होता की युक्रेनियन लोकांनी आधीच युरोइंटिग्रेशने निवडले आहे. झेलेन्स्कीचे जवळचे सल्लागार इव्हान बाकानोव्ह यांनी सांगितले की झेलेन्स्कीचे धोरण युरोपीयन युनियन आणि नाटो या दोन्ही संघटनांच्या सदस्यांचे समर्थन करणारे आहे .

सोवियत यूनियनच्या फुटीनंतर युक्रेन हे स्वतंत्र राष्ट्र झाले. युक्रेन युरोपच्या सीमेवर आहे. झेलेन्स्की यांना रशियाच्या अधिपत्याखाली राहण्याची इच्छा नव्हती. मुख्यतः नाटो देश व अमेरिकेला त्याची पसंती होती. युक्रेनवर नाटो व युरोपियन युनिअनचा डोळा होत. त्यामुळे त्यांनी युक्रेनच्या सहभागाला लगेचच तत्वतः मान्यता दिली. रशियाला ही युती मान्य नव्हती. युक्रेनच्या जमिनीचा वापर रशियाविरुद्ध होणार अशी त्यांची निश्चित धारणा आहे. झेलेन्स्कीच्या युक्रेनने युरोपीयन युनियन व नाटो या दोन्ही संघटनांचे सदस्यत्व घेऊ नये म्हणून रशियाने प्रयत्न केले. ते फोल ठरले.

झेलेन्स्की यांनी रशियाला एकटे पाडण्याच्या प्रयत्नात पाश्चात्य राष्ट्रांच्या सरकारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला व त्यांची मदत मागितली. 24 फेब्रुवारीच्या पहाटे रशियन आक्रमण सुरू होण्याच्या काही काळापूर्वी झेलेन्स्की यांनी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांतील नागरिकांना संबोधित केले. संबोधनाच्या एका भागामध्ये, ते रशियाच्या लोकांशी रशियन भाषेत बोलले आणि त्यांना युद्ध रोखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वावर दबाव आणण्याचे आवाहन केले. पुढचा इतिहास वाचकांना माहीतच आहे. कुटुंब प्रमुखाने घेतलेले मोठे निर्णय कुटुंबावर दूरगामी परिणाम करतात. तसेच एखादया राष्ट्राध्यक्षाने घेतलेले निर्णय राष्ट्रावर सुद्धा दूरगामी परिणाम करतात. त्यासाठी कुटुंबप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुखाचे निर्णय हे परिस्थितीअन्वये विचारपूर्वक चर्चा करून राष्ट्र किंवा कुटुंबाच्या भावी पिढीवर व त्यांच्या जीवनावर होणार्‍या परिणामांचा विचार करूनच निर्णय होणे नेहमी हिताचे ठरते.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी घेतलेले निर्णय व रशियाविरुद्ध गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या लढाईने फक्त युक्रेन नव्हे तर संपूर्ण जगाला महागाईच्या झळा पोहोचल्या आहेत. यासाठीच राष्ट्राध्यक्षाचे निर्णय किती महत्वपूर्ण असतात हे दिसून आले. या झेलेनस्कींचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा स्वभाव, मानसिकता यावर हस्तसामुद्रिकद्वारा आज प्रकाश टाकणार आहोत.

उजवा हात – झेलेन्स्की अभिनेते असले तरी त्यांचा हात व अंगठा मजबूत बांध्याचा आहे. तळहातावरील ग्रह शुभकारक आहेत. बोटांवरची पेरे समप्रमाणात व तिसरे रवीचे बोट व करंगळी लांब आहे. मजबूत हात व अंगठा पहिल्या पेर्‍यात जाड व रुंद असल्यामुळे मी करील तो कायदा, मी म्हणेन ते प्रमाण व हिंसाचारात किंवा युद्धात वीर मरण आलेले देशोधडी लागलेल्या त्यांच्यात देशातील बांधवांची किंचितही तमा किंवा दुःख मानून न घेणारी मानसिकता झेलेन्स्की यांच्यात आहे. देश बेचिराख होताना आपली मते लादणे मार्शल लॉ जारी करून पुरुषांना देश सोडण्यास बंदी घालणे. वयस्क पुरुषाला सुद्धा सात दिवसाच्या प्रशिक्षणानंतर युद्धात सामील करून घेणे व देशासाठी बलिदान देण्यासाठी प्रेरित करणे हे झेलेन्स्की यांच्या कठोर व हट्टी व्यक्तिमत्वाचे पैलू होत. रवीचे बोट मोठे असल्याने ते प्रसिद्धीसाठी हपापलेल आहेत.

बुध ग्रहाची करंगळी लांब असल्याने भावनिक भाषण देऊन राष्ट्रप्रेमाचे धडे देण्यात ते तरबेज आहेत. रशियाशी चालू असलेल्या युद्धात सुमारे एक वर्षापासून अधिकच्या काळात युरोपियन युनियन, अमेरिका यांनी दिलेल्या शस्रांच्या मदतीने युक्रेन सैनिकांच्या नव्हे तर नागरिकांच्या मदतीने युद्ध लढत आहे. दररोज शेकडो युक्रेनी बलिदान देत आहेत. हे सर्व होत असताना अमेरिका व इतर देश आपली शस्त्रे युक्रेनला विकून कमाई करीत आहेत. इतर देशांकडून येणारी मदत व पैसा यांचा हिशोब फक्त झेलेन्स्की व त्यांच्या मंत्रिमंडळाला ठाऊक आहे. झेलेन्स्की यांच्या हातावरील हृदय रेषा शनि ग्रहाच्या म्हणजेच मधल्या बोटाच्या खाली थांबली आहे. ही हृदय रेषा त्यांच्या हातावरील इतर रेषांपेक्षा जाड व पसरट आहे. अशी हृदय रेषेची स्थिती असता असेल लोक स्वार्थी, कवडीचुंबक असतात. आपल्या संपत्तीत कशी वृद्धी होत राहील याची चिंता यांना कायम असते.

झेलेन्स्की यांच्या हातावरील मस्तक रेषा व आयुष्य रेषेत उगमस्थानी मोठे अंतर आहे, अशी स्थिती असता असे लोक दुसर्‍याचे बिलकुल ऐकत नाही. यांच्या म्हणण्याप्रमाणे समोरचा वागत नसेल तर हे त्याच्याशी वैर पत्करतात. त्याचे खच्चीकरण करतात. झेलेन्स्की यांच्या हातावर आयुष्य रेषेसोबत मंगळ रेषा वय वर्ष सत्तरपर्यंत आहे. त्यामुळे त्यांचे अंगी अधिकची ऊर्जा व क्रोध आहे. याच्याशी जे गोड बोलतात, स्वार्थासाठी त्यांना मदत करतात ते झेलेन्स्की यांना वंदनीय व मित्र होत. झेलेन्स्की यांच्या हातावरील अंगठ्याच्या आतील मंगळ ग्रहावरून एक रेषा उगम पाऊन ती शनी बोटाच्या म्हणजे मधल्या बोटांखालील ग्रहावर जाऊन थांबली आहे व ही रेषा हृदय रेषेला आडवी आली आहे व हृदय रेषेचा प्रवास मंगळ-शनी रेषेने रोखला आहे. ही मंगळ शनी रेषा विध्वंसक मनोवृत्तीची आहे.

या रेषेममुळे युक्रेनच्या युद्ध जन्य स्थितीचा मोठा आर्थिक फायदा करून घेण्याची झेलेन्स्की यांची मानसिकता वाढीस लागली आहे. युध्य चालू रहावे मदत व शस्रास्रे मिळत राहावीत त्यातून राष्ट्र प्रेमाच्या नावे स्वतःची मोठी कमाई होत राहावी, अशी प्रवृत्ती जोपासली गेली आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर मनगटाकडे लांबपर्यंत उतरली आहे. या रेषेनेच झेलेन्स्की यांना अभिनय कौशल्याची देणगी दिली आहे. रवी ग्रहावरील रेषा व रवीचे लांब बोट अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देत आहे. झेलेन्स्की ह्यांनी राष्ट्रपतीची भूमिका मालिकामधून केली, त्याला युक्रेनमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भ्रष्टाचाराविरुद्ध व सामान्य जनतेत असलेल्या प्रस्थापित नेत्यांची कारस्थाने, रोष, लोक उपयोगी कायदे, सुधारणा, कर कमी करण्याची हमी अशा अनेकविध सामान्य लोकांच्या मनातील वेदना मालिकेतून दाखवून व त्यात स्वतः राष्ट्रपतीच्या भूमिकेत त्याचे निराकारण केल्याच्या कथा गुंफल्यामुळे झेलेन्स्की यांनी जनसामान्यांतून प्रचंड प्रसिद्धी मिळविली. या प्रसिद्धीचा फायदा झेलेन्स्की यांनी उठविला व मालिकेच्याच नावाने स्वतंत्र राजकीय पक्ष्याची स्थापना केली व प्रचंड बहुमताने ते राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्रपती झाल्यानंतर झेलेन्स्की यांच्या मूळ स्वभाव जागा झाला. सत्ता हातात आल्यामुळे अभिनेता ते राष्ट्राध्यक्ष झालेल्या झेलेन्स्की यांना आभाळ छोटे झाले. कुठलीही राजकीय व सामाजिक कामाची प्रत्यक्ष जाण व कल्पना नसल्याने या अभिनेत्याला आंतरराष्ट्रीय राजकारण मालिकेप्रमाणे जगाची कथा आहे; असे वाटू लागल्याने झेलेन्स्की यांचे सर्व निर्णय फसत गेले. युक्रेन पुढील पन्नास वर्षे तरी सावरू शकणार नाही इतकी हानी युद्धामुळे झाली आहे.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या