आस गणेशाची, साहित्य रसिकाची!

नाशिकरोड ।प्रतिनिधी Nashik Road

करोनाच्या (Corona) आव्हानात्मक काळाला सामोरे जाण्यासाठी बौद्धिक उर्जेची (Intellectual Energy) आवश्यकता आहे.

गणपती (Ganpati) ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात (Ganeshotsav) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (Maharashtra Sahitya Parishad) नाशिकरोड (Nashik Road) शाखेने आस गणेशाची.. साहित्य रसिकाची! हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी यांनी दिली.

या उपक्रमात शाखेचा प्रत्येक सभासद गणेशोत्सवाच्या दहा दिवसात साहित्यिक अथवा साहित्य निर्मितीतील घटकाच्या घरी जाऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेणार आहे. करोना संकटातून (Corona Crisis) विश्वाला मुक्त करण्यासाठी साकडे घालणार आहे.

सभासदांनी त्याचा फोटो काढून कार्यकारणी सदस्य दशरथ लोखंडे किंवा धारा भांड-मालुंजकर यांच्याकडे पाठवावा. शाखेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने ठरल्यानुसार मराठी मायबोलीच्या सेवा कार्यात जास्तीत जास्त सभासदांनी भाग घ्यावा, असे आव्हान कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, कार्यवाह रविंद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई आदींनी केले आहे.

उपक्रमात आघाडी

गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना करोनाने भीतीदायक वातावरणात जखडून ठेवले आहे. त्यातच मोबाईल व सोशल मीडियाच्या (Social Media) अतिवापरामुळे मराठी (Marathi) साहित्याचा विसर पडल्यागत वाटत आहे. काळाच्या पाऊलखुणा ओळखून शाखेने गेल्या 540 दिवसांपासून व्हर्च्युअल ग्रंथालय (Virtual library) उपक्रम सुरु ठेवला आहे.

त्यात रोज एक ई-पुस्तक सभासद (E-book Members) आणि राज्यभरातील नोंदणीकृत अठराशे रसिकांना पाठवले जाते. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय दहावीपर्यंत अनिवार्य करण्यासाठी शाखेने जिल्हास्तरीय परिसंवाद घेऊन त्याचा अहवाल राज्य शासनाकडे (State Government) सादर केला होता.

मुंबईतील (Mumbai) धरणे आंदोलनातही सहभाग घेतला होता. त्याला यश येऊन शासनाने सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गात मराठी विषय सक्तीचा केला आहे. शाखेतर्फे वसंत व्याख्यानमाला, संवाद सृजनाशी, मराठी विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, साहित्य संमेलन अध्यक्षांचा सत्कार आदी उपक्रमही राबविले जातात.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *