Thursday, May 2, 2024
Homeनगरमांडवगण मधील 'त्या' कृषी सेवा केंद्रावर अखेर कारवाई होणार..

मांडवगण मधील ‘त्या’ कृषी सेवा केंद्रावर अखेर कारवाई होणार..

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील मांडवगण (Madavgan) येथील आनंद ऍग्रो सेंटर मधून जास्त दराने युरिया (Urea) विकत असल्याची तक्रार कृषी विभागाच्या भरारी पथकाला (Bharari Squad of the Department of Agriculture) प्राप्त झाली होती. यात तथ्य आढळल्याने तसेच जादा दराने युरिया आणि खत विक्री होत असल्याचे पुरावे सापडल्याने या दुकानदाराचा खत विक्री परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव तालुका कृषी विभाग पाठवणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के (Taluka Agriculture Officer Padmanabh Mhaske) यांनी सांगितले.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रा (Agricultural Service Center) विषयी जास्त दराने युरिया विक्री करणे, ठरावीक ग्राहकांनाच युरिया विक्री करणे या बाबतीत तक्रारी वारंवार कृषी विभागाकडे गेल्या आठवड्या पासुन येत होत्या. मात्र भक्कम पुरावा सापडत नसल्याने ठोस कारवाई करणे शक्य होत नव्हते.

मात्र आज भरारी पथकाकडे दुरध्वनी वरुन आलेल्या तक्रारीमुळे अखेरीस मांडवगण येथील खत विक्रेते – आनंद ऐग्रो सेटंरचा आज भान्डा फोड झाला. आज सकाळी दुरध्वनी द्वारे आलेल्या तक्रारीची दखल कृषि विभागाच्या भरारी पथकाकडून चौकशी करण्यात आली. तक्रारदाराचे संबधीत खत विक्रेत्याशी फोन वरुन झालेल्या बोलण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग व किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे बिले चौकशी दरम्यान आढळुन आल्याने संबधीत खत विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस कृषी विभागाच्या श्रीगोंदा तालुक्यातील भरारी पथकाकडुन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांना करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या