नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश; राणे-शिवसेना वाद चिघळणार?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिंधुदुर्गातील बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे राणे विरुद्ध शिवसेना (Shivsena) वाद पुन्हा चिघळण्याची चिन्ह आहेत…

भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट ॲण्ड क्लायमेट चेंज (Ministry of Environment Forest and Climate Change) नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला राणे यांच्या सिंधुदुर्गातील (Sindhudurg) मालवण चिवला (Malvan Chivla beach) बीचवरील नीलरत्न (Neelratna bungalow) या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

औरंगाबाद रोडवर ट्रक-जीपचा अपघात; एक जखमी

दरम्यान, नारायण राणेंच्या आदिश बंगल्याच्या पाहणी नाट्यानंतर नीलरत्न बंगल्याला (Neelratna bungalow) ही कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मातोश्री २ (Matoshri 2) अनधिकृत असल्याचे म्हटले होते.

…म्हणून समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

त्यानंतर ऑगस्ट 2021 ला दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी काल पत्र पाठवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *