Wednesday, April 24, 2024
Homeजळगावबेशिस्त वाहनांवर धडक कारवाई !

बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई !

शहरातील सर्वच मुख्य चौक तसेच शहराबाहेर जाणारे मार्गांवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून यात सुमारे 15 दुचाकींसह आठ प्रवासी रिक्षां पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या. आगामी काळात बेशिस्त पार्कींग करणार्‍या वाहनांवर कारवाईला गती देण्यात येणार असून वाहन चोरीचे प्रकार यात उघड होण्याची शक्यता आहे.

देवीदास कुनगर, पो.नि. वाहतूक शाखा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात विेशेषतः जळगाव शहरात दुचाकी वाहन चोरीच्या प्रकारात वाढ झाली असून रस्त्यातच बेशिस्तपणे पार्कीग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या दुचाकी वाहनांसह मास्कचा वापर न करणे आणि ट्रिपल सीट वाहने चालविणे, रिक्षात फ्रंटसीटवर प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनांवर जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

करोनाकाळातच नव्हेतर या अगोदर देखिल वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांविरुद्ध वाहतूक पोलिस तसेच आरटीओ प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत होती.

कोरोना काळात मास्कचा वापर न करता वाहन चालविणे, सोबत कागदपत्रे न बाळगणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे आदी प्रकरणी पोलीस प्रशासनाने दुचाकी तसेच वाहनचालकांविरुद्ध शहरातील महामार्गासह प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतूक नियम मोडणार्‍या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

मात्र पोलीस कारवाई होवूनही वाहनचालक अजूनही बिनधास्तपणे ट्रिपल सीट जात असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याबरोबरची अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे वाहतुक पोलिस प्रशासन सुत्रांनी सांगीतले.

नाईलाजास्तव कानाडोळा

सद्यस्थितीत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर स्पेशल तसेच केवळ आरक्षीत श्रेणीच्याच प्रवाशांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. लोहमार्गावरील अनेक लहान मेाठया स्थानकांव्दारे ग्रामीण भागाला जोडणार्‍या साधे व जनरल तिकीट घेउन प्रवास करू इच्छिणार्‍या सर्व सामान्य नागरीकांसह मासिक पासधारक नियमित प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे सर्वसामान्य नागरीक कुटूंबकबिल्यासह नाईलाजाने एका दुचाकीवर तीन ते चार जण प्रवास करीत असून नोकरदार,व्यावसायीक स्वतःच्या वाहनाने नोकरी व्यवसायाचे ठिकाण गाठत आहेत, यामुळे देखिल पोलिस प्रशासनपाकडून काही ठिकाणी नाईलाजास्तव कानाडोळा केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या