प्लास्टिक विरोधात चार जणांवर कारवाई

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव | jalgaon

शहरातील सुभाष चौक, चित्रा चौक, राजकमल चौक परिसरात मनपाने प्लास्टिक विरोधात कारवाई केली. यात चार जणांकडून किरकोळ स्वरुपात प्लास्टिक जप्त केले. तसेच इतर पथकांद्वारेही कारवाई करण्यात आली. याद्वारे ३० ते ४० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच तीन ते चार हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी प्लास्टिक व इतर कारवाईसाठी काही पथकांची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसापासून प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू असून पथकाने सोमवारी शहरातील वर्दळीच्या भाग म्हणजे सुभाष चौक, चित्रा चौक, राजकमल चौक परिसरात कारवाई करीत प्लास्टिक जप्त केले. तर काही जणांवरतीन ते चार हजार रुपयेची दंडात्मक करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *