Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकआरटीओची धडक कारवाई

आरटीओची धडक कारवाई

पंचवटी । वार्ताहर

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या संबंधित वायूवेग पथकामार्फत कारवाई सुरू असून यात विशेषतः क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणार्‍या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणार्‍या 53 वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून फेब्रुवारी 2021 अखेर 4 कोटी 1 लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.

- Advertisement -

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मार्च महिना सुरू असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकातर्फे वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.यात विशेषतः क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणार्‍या वाहनांच्या विरोधात धडक मोहीम सुरू आहे. वायूवेग पथकाने क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणार्‍या 53 वाहनांवर कडक कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासह इतर गुन्ह्यांवर कारवाई करून 45 लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहन चालकाच्या लायसन्स निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात येतात. त्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या समितीद्वारे पुढीलप्रमाणे गुन्हे आहेत . यात धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे / लाल सिग्नल तोडणे, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे , वाहन चालवितांना अमली पदार्थाचे सेवन करणे , वाहन चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर करणे , निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे.

याप्रमाणे गुन्हा घडल्यास वाहन चालकाचे लायसन्स 90 दिवसांसाठी निलंबित करण्यात येते. कार्यालयाने केलेल्या केस व पोलीस विभागाकडून प्राप्त झालेले प्रस्ताव यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने लायसन्स निलंबनाची कारवाई करून 221 लायसन्स धारकांचे लायसन्स 90 दिवसांसाठी निलंबित केले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहिरे यांनी दिली आहे.

रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षा जपण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन विभागा कडून अशीच धडक कारवाई सुरू राहणार आहे . त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून कारवाई टाळावी .

– विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या