Wednesday, April 24, 2024
Homeजळगावमास्क न लावलेल्या 132 जणांवर कारवाई

मास्क न लावलेल्या 132 जणांवर कारवाई

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाईचे सत्र लागोपाठ दुसर्‍या दिवशीही कायम ठेवत शुक्रवारी दिवसभरात 132 विना मास्क असणारे व नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याबद्दल फुले मार्केट परिसरात 2 दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ही कारवाई केली. एकूण 26 हजार 400 रुपये रकमेचा दंड वसूल करण्यात आला.

- Advertisement -

26 हजार 400 रुपयेेचा दंड

मनपा अतिक्रमण विभागाने लागोपाठ दुसर्‍या दिवशीही कारवाईचे सत्र कायम ठेवत दिवसभर टॉवर चौक, फुले मार्केट, एम जी. रोड परिसरात कारवाई केली.

या कारवाईने हॉकर्स, व्यापारी, दुकानदार तसेच विना मास्क फिरणारे नागरिक असे सारेच धास्तावले असल्याचे दिसून आले.

कोरोनाचे भय संपले म्हणून जवळपास 50 टक्केच्या वर दुकानदार, नागरिक हे शहरात विना मास्क आढळून येत आहेत. सध्या अद्याप कोरोनाचे भय संपले नाही, दुसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे.

शहरात पुन्हा कोरोनाचा कहर वाढू नये या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने यापुढे आता आपली कंबर कसली आहे.

फुले मार्केटमध्ये 2 दुकाने सील

फुले मार्केट परिसरात मनपा अतिक्रमण विभागाने आपला ठिय्या मांडला. या कारवाईत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याने 2 दुकाने सील करण्यात आले.

तसेच रस्त्यावरील विविध हॉकर्सचे अतिक्रमणात व जागा व्यापणारे साहित्य जप्त केले. यात लोखंडी स्टँड, टपर्‍या, टेबल बाकडे, शिलाई मशीन आदींचा समावेश आहे.

करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा अतिक्रमण तसेच दंड आकारणार्‍या पथकांतर्फे विना मास्क असणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणे सुरूच राहणार आहे.

मग ते मनपाचे कर्मचारीअसोत की पोलिस कर्मचारी अथवा शासकीय कर्मचारी असो. सर्वांना नियम हे बंधनकारक असल्याचे उपायुक्त वाहुळे यांनी स्पष्ट केले.

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना खबरदारीचा उपाय म्हणून विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर प्रत्येकी 200 रुपयांचा दंड करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

या कारवाईप्रसंगी पथकात संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, सुनील पवार, भानुदास ठाकरे, राजु वाघ, हुस्नोद्दीन भिस्ती, मुकेश सोनवणे, पंकज कोळी, बंटी सोनवणे आदींचा या पथकात समावेश होता.

निर्बंध होणार कडक

फुले मार्केट परिसरासह शहरातील इतर बहुतेक ठिकाणी यापुढे निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेतही मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून मिळत आहेत.

पोलिस बंदोबस्त यावेळी चोख प्रमाणात होता. या कारवाईने सामान्य नागरिकांचीही एकच धावपळ होत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या