Friday, April 26, 2024
Homeनगरगुन्हेगारांवर वचक निर्माण करुन सर्वसामान्यांचा विश्वास जिंका

गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन सर्वसामान्यांचा विश्वास जिंका

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) –

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना विश्वासात घेऊन मानवतेचा स्पर्श करत निःपक्षपातीपणे सोडवावेत, यामुळे पोलीस दलाची

- Advertisement -

प्रतिमा अधिक चमकदार बनेल. तालुक्यातील सर्व गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.

शेवगाव पोलीस ठाण्यास शुक्रवारी (दि. 12) वार्षिक तपासणी निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट देत अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटलांशी संवाद साधला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, विश्वास पावरा, उपनिरीक्षक सोपानराव गोरे आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पाटील यांनी तालुक्यातील घडामोडींबरोबरच पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. जनता दरबार घेऊन कर्मचार्‍यांचे प्रश्न समजावून घेतले. तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी जनतेशी एकरुप होऊन काम केल्याशिवाय त्यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार नाही. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महावितरण विभागाच्या कृषी ऊर्जा पर्व या पुस्तिकेचे प्रकाशन पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. एम, लोहारे, सहाय्यक अभियंता सुशील तायडे, सहाय्यक लेखापाल सुरेश जायभाये, शेवगाव शहराचे फोरमन ज्ञानेश्वर बडधे, सचिन बारगजे, विष्णू उगलमुगले आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटील संघटना व वंंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा सत्कार वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या