Friday, April 26, 2024
Homeधुळेमहिलेवर अ‍ॅसिड हल्ला, तरूणाला अटक

महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, तरूणाला अटक

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

दागिने उजळण्यास नकार दिल्याचे कारणावरून महिलेच्या अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना

- Advertisement -

काल दुपारी रायपूर (ता. साक्री) गावात घडली. त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सुनंदाबाई दगडु कोरडकर (वय 28 रा. रायपुर ता. साक्री) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

ही महिला काल दि. 22 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील मंदिर परिसरात उभी होती.

त्यादरम्यान मिथुनकुमार धनसिंग शहा (वय 26 रा. भागापूर, बिहार, मध्यप्रदेश) या तरूण आला. त्याने सुनंदाबाई यांना तुमचे अंगावरील चांदीचे दागिने उजळून देतो, असे सांगितले.

त्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरूणाने त्याच्याजवळील अ‍ॅसिड थेट महिलेच्या अंगावर फेकले. त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी सुनंदाबाई कोरडकर यांनी निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मिथुनकुमार शहा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना कांगणे करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या