Saturday, April 27, 2024
Homeनगरमालुंजा बुद्रुक सरपंचपदी अच्युत बडाख

मालुंजा बुद्रुक सरपंचपदी अच्युत बडाख

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लोकसेवा विकास

- Advertisement -

आघाडीचे अच्युतराव गुलाबराव बडाख यांची, तर उपसरपंचपदी सौ.अंजनी सखाहरी शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मैड यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी के.पी.देसाई, कामगार तलाठी बाबासाहेब कदम, कोतवाल मनोज क्षीरसागर, सहाय्यक लिपिक रावसाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंचपदासाठी अच्युतराव बडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदासाठीही सौ.अंजनी शेंडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या