Wednesday, April 24, 2024
Homeनगरआज समाजाला नैतिकतेची गरज- आचार्य पुलक सागरजी महाराज

आज समाजाला नैतिकतेची गरज- आचार्य पुलक सागरजी महाराज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

70-75 वर्षांपूर्वी जसा भारत होता तसाच राहिलेला नाही, ‘रोटी कपडा आणि मकान’ ची जेवढी गरज त्याकाळी होती ती आता राहिली नाही आज गरज आहे ती नैतिकतेची. आज माणसाचे वेगाने नैतिक पतन होत आहे. ते घरात असो, परिवारात असो, समाजात असो की देशात याला रोखण्याची आवश्यकता आहे. नाहीतर संसाधन कितीही आधुनिक होऊ द्या यातून कोणताही देश समाज शांततेने राहू शकत नाही, अशी भीती भारत गौरव प्राप्त आचार्य पुलक सागरजी महाराज यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

शहरातील आझाद मैदानावर आज रविवार दि. 22 मे पासून 26 मे पर्यंत दररोज सकाळी 8.30 ते 10 या वेळेत राष्ट्रसंत आचार्य पुलक सागर महाराज यांचे प्रवचनाचे आयोजन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले प्रवचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर लोकांमध्ये नैतिकता आणि मानवतेची जागृती करू. बोलण्याने व ऐकण्याने माणूस अनैतिक होतो. त्याचप्रमाणे तो नैतिकही होऊ शकतो. चांगले विचार आले तर त्याचे विचार व संस्कार बदलतील, असा विश्वास व्यक्त करुन पाश्चात्य संस्कृतीकडे देश वळतो आहे. त्यात माध्यमांचा वाटा मोठा आहे.

अहिंसा व वैचारिक क्रांती संतांच्या माध्यमातून व्हायला हवी. कारण आपला देश आजही संतांचे ऐकतो. जोपर्यंत एकोतो तोपर्यंत भविष्य उज्वल आहे. संत आज दुहेरी भूमिकेत दिसत आहेत. बोलतात एक आणि वागतात वेगळेच. संत जेलमध्ये ही जात आहेत व न्यायालयात उभे राहतात. त्यामुळे आजची युवापिढी त्यांचे कसे ऐकेल. आज संत कमी आणि कथावाचक व प्रचाराकही अधिक आहेत. तसेच राजकारणातही संतांचा वावर वाढला आहे.

आज देशाला सर्वात जास्त धोका कट्टरतावादच आहे. कट्टरतावाद मग तो कोणत्याही धर्माचा असो. जो उन्मादक निर्माण करतो. देशाबद्दल कट्टर जरूर यावे दुसरीकडे संतांविषयी कट्टर राहुन देशात भांडणे होणे हे उचित नाही. जगात सर्वाधिक युवाशक्ती भारताकडे आहे. या युवकांना चांगली दिशा दिली तर जगाचे भविष्य उज्वल होईल अन्यथा त्यांचे भविष्य व आपले म्हातारपणही बिघडेल, असेही ते म्हणाले.

आज समाज समाजामध्ये सुरू असलेल्या परिस्थितीविषयी विचारले असता संत पण राजकारणात गेले आहेत. संत आपली दिशा सोडत आहेत असे त्यांनी सांगितले. हनुमान चालीसा व अभंग याविषयी विचारले असता कोणी कोणत्याही प्रकारची प्रार्थना करू त्याचा कोणाला त्रास व्हायला नको मात्र यात अहंकार आला तर भांडणाचे कारण ठरतो. ध्वनी प्रदूषण सर्वत्र आहे, त्यामुळे सर्वांना समान न्याय हवा. सर्वोच्च न्यायालय सांगितले आहे आवाज कमी करा दुसर्‍यांना त्रास देणे याला धर्म म्हणत नाही.

मला संथारा व्रत हे केवळ जैन धर्म पुरते मर्यादित नसून वैदिक व वैष्णव समाजामध्ये ही ते आहे. संथारा म्हणजे आत्महत्या होऊ शकत नाही. जीवनाला कंटाळला तो आत्महत्या करतो मात्र तशी परिस्थिती संथारा मध्ये नाही. यात माणूस असंच हसत मृत्यूला सामोरे जात असतो. न्यायदेवतेने ही त्याला मान्यता दिली आहे. असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

समाजाचे माजी अध्यक्ष अनिल पांडे यांनी प्रास्ताविक तर आभार समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या